Loan Against Property : प्रॉपर्टीवर लोन घेत असाल तर ‘या’ 5 गोष्टींची विशेष काळजी घ्या

मुंबई : प्रॉपर्टी लोन हे एक सुरक्षित लोन मानले जाते. यामध्ये तुम्ही तुमची कोणतीही मालमत्ता गहाण ठेवता आणि त्या बदल्यात बँकेकडून कर्ज घेता. यानंतर तुमचे उत्पन्न, क्रेडिट हिस्ट्री आणि प्रॉपर्टीचे वर्तमान मूल्य या गोष्टींच्या आधारावर बँक तुम्हाला लोन देते. हे लोन घेताना लोकांनी कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी याबद्दल आज आपण जाणून घेणार आहे.
प्रॉपर्टी लोन घेताना ‘या’ 5 गोष्टींची घ्या काळजी
१) व्याजदरांची तुलना न करणे
प्रॉपर्टी लोन करण्यासाठी साठी लेंडर निवडण्याआधी लेंडरच्या व्याजदरांची तुलना करावी. त्यानंतरची लेंडरची निवड करावी. अश्या लेंडरची निवड करावी ते कमी इक्वेटेड मंथली इंस्टॉलमेंटसह परवडणारे दर देते.
२) कर्जाच्या कालावधीकडे लक्ष न देणे
प्रॉपर्टी लोनचा कालावधी खूप महत्वाचा आहे. तुमच्या सोयीनुसार विचार करून कर्जाचा कालावधी निवडा. तुम्ही कर्जाची लवकर परतफेड करू शकत असाल तर कमी कालावधी निवडा. कमी कालावधीसाठी कमी व्याजाची रक्कम भरावी लागते.
३) लोन ॲग्रीमेंटकडे दुर्लक्ष करणे
कर्ज घेताना, अनेक लोक त्यांना कोणत्या अटी व शर्तीनुसार हे लोन देण्यात आले ते वाचत नाहीत. त्यामुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे कर्ज घेताना ॲग्रीमेंट नीट वाचून घ्यावे.
४) डिस्बर्सल वेळ जाणून घ्या
मालमत्तेवरील कर्ज प्रक्रियेसाठी वेळ लागतो कारण कर्ज मंजूर करण्यापूर्वी कर्जदाराला तुमच्या मालमत्तेच्या मूल्याचे मूल्यांकन करण्यासाठी वेळ लागतो. अशा स्थितीत, कर्ज देणाऱ्याने कर्ज मंजूर करण्यासाठी आणि वितरित करण्यासाठी घेतलेल्या वेळेची माहिती घेणे आवश्यक आहे, जेणेकरून तुम्ही तुमच्या निधीच्या गरजा लेंडरच्या डिस्बर्सल शेड्यूलसोबत मॅच करु शकाल.
५) तुमच्या क्रेडिट स्कोअरकडे दुर्लक्ष करणे
प्रॉपर्टी लोन हे एक सुरक्षित कर्ज आहे. परंतु तुमच्या कर्ज अर्जावर प्रक्रिया करताना तुमचा क्रेडिट स्कोअर विचारात घेतला जातो. हाय क्रेडिट स्कोअर तुम्हाला सुलभ अटींवर कर्ज मिळवण्यात मदत करू शकतो. तसेच तुमचे कर्ज लवकर मंजूर होण्याची शक्यता असते.





