Raj Thackeray Live | राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; मला पक्षातून बाहेर…

Updated On:
Raj Thackeray Live | राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; मला पक्षातून बाहेर…

Raj Thackeray Live – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दसरा मेळाव्यानिमित्ताने पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे, मुंबईतील शिवाजी पार्क मैदानातून संबोधित करत आहेत. राज्यात झालेला सत्ताबदल, शिवसेना पक्ष व चिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडे जाणे या महत्वपूर्ण राजकीय घडामोडींवर राज ठाकरे कोणती भूमिका मांडणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.

राज ठाकरेंच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे |  Live Raj Thackeray Live | MNS chief Raj Thackeray Live | MNS Adhikrut | Raj Thackeray Dasara Melava Live Speech |

– शिवसेना – उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मनसेला संपलेला पक्ष असा उल्लेख केला होता. यावरून जोरदार टोला लागवताना, उपस्थितांच्या गर्दीकडे बोट दाखवत मग ही जमलेली गर्दी काय आहे? असा प्रश्न राज ठाकरे यांनी विचारला. संपलेला पक्ष म्हणणाऱ्यांची आज काय परिस्थिती आहे? असेही राज ठाकरे यांनी विचारले.

– शिवसेना सोडतानाही मी म्हणालेलो, माझा वाद माझ्या विठ्ठलाशी नाही आजूबाजूच्या बडव्यांशी आहे.

– मी पक्ष सोडतानाच सांगितलेलं ही चार टाळकी पक्ष खड्ड्यात घालणार.

– मी पक्षाबाहेर पडावं, यासाठी उद्धव ठाकरेंचे षडयंत्र – राज ठाकरेंचा मोठा आरोप.

– नारायण राणे पक्षातून बाहेर पडले नसते, मी स्वतः फोन करून बाळासाहेबांना बोललो होतो. बाळासाहेबही राणेंना घेऊन ये म्हणालेले. मात्र कोणीतरी बाळासाहेबांचे विचार बदलले.

– पक्ष ज्या पद्धतीने चालवला गेला त्याचं फलित म्हणजे पक्षात पडलेली फूट.

– भाजप बरोबर निवडणूक लढवून काँग्रेस, राष्ट्रवादी सरकार हा काय प्रकार?

– उद्धव ठाकरेंच्या मागे सभा घेत फिरू नका, महाराष्ट्रासाठी काम करा – राज ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना सल्ला.

– कोर्टावर अवलंबून असलेलं सरकार पहिल्यांदा पाहिलं.

– आताच विधानसभेच्या निवडणुका लावा.

– मला जावेद अख्तर यांच्यासारखे मुसलमान पाहिजेत, पाकिस्तानात जाऊन पाकिस्तानला खडेबोल सुनावणारे भारतीय मुसलमान असावेत.

– राज ठाकरे यांच्या भाषणात जावेद अख्तर यांचा पाकिस्तानातील व्हिडीओ. जावेद अख्तर यांचे राज ठाकरेंकडून तोंडभरून कौतुक.

– मशिदीवरील भोंगे बंद करा, किंवा आम्ही करू – राज ठाकरेंचा सरकारला इशारा.

आणखी संबंधित बातम्या

Ashish Shelar : ठाकरे बंधूनी काढलेली निषेध रॅली म्हणजे कोल्ह्यांचा मोर्चा होता; मंत्री आशिष शेलार यांची टीका

2026-10-04 17:06:42

Ashish Shelar : ठाकरे बंधूनी काढलेली निषेध रॅली म्हणजे कोल्ह्यांचा मोर्चा होता; मंत्री आशिष शेलार यांची टीका

Mumbai Police : ठाकरेंच्या मोर्चाचा मार्ग बदलला.! मुंबई पोलिसांच्या विनंतीवरून ठाकरेसेना आणि मनसेचा निर्णय

2026-10-02 19:52:26

Mumbai Police : ठाकरेंच्या मोर्चाचा मार्ग बदलला.! मुंबई पोलिसांच्या विनंतीवरून ठाकरेसेना आणि मनसेचा निर्णय

Political News : राजकीय वर्तुळात खळबळ ! आंदोलनापूर्वी मनसेच्या 'या' बड्या नेत्याला अटक

2026-10-02 17:32:46

Political News : राजकीय वर्तुळात खळबळ ! आंदोलनापूर्वी मनसेच्या 'या' बड्या नेत्याला अटक

Satara News: ...तर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल! सातारा मनसेचा अन्न अन् औषध प्रशासनाला अल्टिमेटम

2026-10-02 00:15:05

Satara News: ...तर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल! सातारा मनसेचा अन्न अन् औषध प्रशासनाला अल्टिमेटम

Mira-Bhayandar : मिरा भाईंदर ‘जैनांची नगरी’ असल्याचा भाजप आमदाराचा दावा; मनसेने कडक शब्दात दिला इशारा

2026-10-01 12:17:22

Mira-Bhayandar : मिरा भाईंदर ‘जैनांची नगरी’ असल्याचा भाजप आमदाराचा दावा; मनसेने कडक शब्दात दिला इशारा