Lions Club Pune : ‘लायन्स क्लब पुणे’ भोसरीच्या वतीने देशी गो संवर्धन व गोशाळा प्रकल्पासाठी लाखमोलाची मदत
खटाव येथे लायन्स क्लब ऑफ पुणे भोसरी यांच्या वतीने यशवंत बाबा सेवा फाऊंडेशन, खटाव येथे देशी गो संवर्धन व गोशाळा प्रकल्पासाठी गाईंच्या निवाऱ्यासाठी शेड साहित्य व लाखाची आर्थिक मदत करण्यात आली.

Lions Club Pune – खटाव येथे लायन्स क्लब ऑफ पुणे भोसरी यांच्या वतीने यशवंत बाबा सेवा फाऊंडेशन, खटाव येथे देशी गो संवर्धन व गोशाळा प्रकल्पासाठी गाईंच्या निवाऱ्यासाठी शेड साहित्य व लाखाची आर्थिक मदत करण्यात आली. यावेळी लायन्स क्लब ऑफ पुणे भोसरी यांच्याकडून एक लाख एक हजार एकशे अकरा रुपये किंमतीचा धनादेश फौंडेशनच्या सदस्यां जवळ सुपूर्द करण्यात आले व पांडुरंग राऊत कुटूंबीयांकडून शेडसाठी लागणारे साहित्य देणार असल्याचे आश्वासन देण्यात आले.
सदर कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व जिल्हा बँक संचालक प्रदीप विधाते, माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक कुदळे, येरळा न्यूजचे संपादक धनंजय क्षीरसागर , मनोज देशमुख ,महेश देशमुख, रसुलभाई मुल्ला ,अमर देशमुख तसेच लाइन्स क्लबचे विशाल गोस्वामी, हिरामण राठोड, के डी कुलकर्णी ,राजेंद्र काळे, जयराम शर्मा, पितांबर पाटील ,पांडुरंग राऊत, गोडबोले, अनिल पुरोहित ,विठ्ठल महाजन, विनीत राऊत, कैलास अंबिके, मोहित सोनवणे, मिलिंद काकडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी प्रणव जगताप यांची इंडियन नेव्ही मध्ये नियुक्ती झाल्यामुळे त्याचाही सन्मान करण्यात आला. यावेळी लायन्स क्लब चे पांडुरंग राऊत, राजेंद्र काळे व हिरामण राठोड यांनी आपली मनोगते व्यक्त केली. तसेच यावेळी धनंजय क्षीरसागर व अशोक कुदळे यांनी देखील मार्गदर्शन केले. आपल्या अध्यक्षीय मनोगतात प्रदीप म्हणाले खटावची युवा पिढी धार्मिक व अध्यात्मिक क्षेत्राकडे वळत असल्याने खटावचे भवितव्य नक्कीच उज्वल आहे.
गोशाळेचा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. लाईन्स क्लब कडून मिळणारी मदत ते छोटीशी म्हणत असले तरी अत्यंत मोठी आहे. भविष्यात अशीच मदत मिळत राहो. आमच्याकडूनही वेळोवेळी सहकार्य मिळत राहील. एक दिवस खटाव मध्ये एक आदर्श गोशाळा निर्माण होईल यात शंका नाही.
यावेळी वेळी आनंद विधाते, किसन शिंदे, किरण राऊत, केशव धुमाळ ,महेश कुंभार, तानाजी माने, गणेश शेडगे, विजय पवार, अभय भोसले, किरण मदणे आदींसह यशवंत बाबा सेवा फाउंडेशन चे सर्व सदस्य व सेवेकरी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन दिगंबर वाघ यांनी केले. आभार मनोज देशमुख यांनी मानले.





