चॅम्पियन्स स्पर्धेत लायन अंतिम फेरीत
Updated On:

माद्रिद – चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या महिला गटात लायन संघाने सलग पाचव्या वर्षी अंतिम फेरी गाठली आहे. उपांत्य लढतीत त्यांनी परिस सेंट जर्मन संघाचा (पीएसजी) 1-0 असा पराभव केला.
या सामन्यात पहिल्या हाफमध्ये एकही गोल नोंदला गेला नाही.
दुसरा हाफ सुरू झाल्यानंतर लायनने आक्रमण वाढवले. त्यावेळी गोल करण्याची संधी लायनने वाया घालवली नाही. त्यांची अव्वल खेळाडू वेन्डी रेनार्ड हिने 67 व्या मिनिटाला गोल केला व संघाला आघाडी मिळवून दिली.
अर्थात उर्वरित वेळेत पीएसजीला गोल करता न आल्याने त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. अंतिम फेरीत आता त्यांचा सामना येत्या रविवारी वुल्फ्सबर्गशी होणार आहे.




