Lionel Messi Retires : लिओनेल मेस्सीचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा; फेअरवेल सामन्यानंतर लेक थियागो भावूक, VIDEO व्हायरल
Lionel Messi Retires : निरोपाचे भाषण संपताच मेस्सीचा मोठा मुलगा थियागो मेस्सी धावत वडिलांकडे आला आणि मेस्सीला घट्ट मिठी मारुन रडू लागल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Lionel Messi Retires From International Football Emotional Farewell With Son Thiago : जागतिक फुटबॉलचा महानायक आणि अर्जेंटिनाचा महान खेळाडू लिओनेल मेस्सीने (Lionel Messi) अधिकृतपणे आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती झाला आहे. ६ ऑक्टोबर २०२६ रोजी बेनिनविरुद्ध अर्जेंटिनासाठी त्याने आपल्या कारकिर्दीतील अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. ब्युनोस आयर्समध्ये झालेल्या या मैत्रीपूर्ण लढतीत अर्जेंटिनाने ३-० असा विजय मिळवला. या ऐतिहासिक सामन्यातही मेस्सीने ७१ व्या मिनिटाला आपल्या ट्रेडमार्क शैलीत अखेरचा गोल नोंदवून निरोपाचा क्षण अविस्मरणीय केला.
मैदानावर वडिलांना मिठी मारून थियागो ढसाढसा रडला!
सामन्यानंतर झालेल्या फेअरवेल भाषणादरम्यान मेस्सीचे संपूर्ण कुटुंब मैदानावर हजर होते. निरोपाचे भाषण संपताच मेस्सीचा मोठा मुलगा थियागो मेस्सी (Thiago Messi) धावत वडिलांकडे आला आणि त्याने मेस्सीला घट्ट मिठी मारली. वडिलांच्या कारकिर्दीचा हा अखेरचा क्षण पाहताना थियागोला अश्रू अनावर झाले. हजारो चाहत्यांच्या उपस्थितीत मेस्सी आणि त्याच्या पत्नीने रडणाऱ्या थियागोला जवळ घेत धीर दिला. या भावुक क्षणाचा व्हिडीओ सध्या जगभरात तुफान व्हायरल होत आहे.
वडिलांच्या पावलावर पाऊल; बार्सिलोना ते मियामी असा थियागोचा प्रवास!
🔴 #Deporte
📌Abrazo sentido de Leonel Messi con su hijo Thiago y esposa, luego de su último juego en el Estadio Monumental bajo el apoyo de 80 mil almas.
📌Messi concluyó su etapa con Argentina como el máximo goleador histórico y el jugador con más partidos disputados de la selección nacional, acumulando 208 encuentros, 126 goles y 70 asistencias. Asimismo, participó en seis Mundiales, sumando 34 partidos y 21 goles.
Vídeo: @latinus_us
— Extra News Mundo (@extranewsmundo) October 7, 2026
मेस्सीप्रमाणेच त्याची दोन्ही मुले फुटबॉल क्षेत्रात घडत आहेत. थियागोने लहानपणापासून बार्सिलोनाची ‘बार्सिलोना एस्कोला’ (Barça Escola) आणि नंतर पॅरिस सेंट-जर्मेनच्या (PSG) युवा संघात प्रशिक्षण घेतले. २०२३ मध्ये मेस्सी कुटुंबीय अमेरिकेत स्थायिक झाल्यानंतर तो इंटर मियामीच्या अकादमीत दाखल झाला असून, ऑक्टोबर २०२६ नुसार तो मियामीच्या अंडर-१५ संघाचा प्रमुख खेळाडू आहे.
एकाच सामन्यात ११ गोल; थियागोची मैदानात वादळी कामगिरी!
lionel andrés messi, el pibe que un día soñó con jugar en la selección argentina hoy es un hombre de 39 años que se retira a nivel selección, gracias por siempre haberlo intentado, por no rendirte y por ser argentino, un país entero te ama 🇦🇷😭🤍 GRACIAS
https://t.co/dkcgldXg4G
— magui VA A VER A BTS 🇦🇷 (@vminangelsx) October 7, 2026
थियागोने २०२४ मध्ये इंटर मियामीच्या अंडर-१३ संघाकडून न्यू वेल्स कप गाजवला होता. २०२५ मध्ये एकाच सामन्यात अटलांटा युनायटेडविरुद्ध त्याने एका डावात तब्बल ११ गोल नोंदवून संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले होते. नुकत्याच पार पडलेल्या जून २०२६ मधील ‘एमआयसी फुटबॉल’ स्पर्धेतही त्याने इंटर मियामीच्या अंडर-१४ संघाला विजेतेपद मिळवून दिले होते.
फुटबॉलच्या एका देदीप्यमान अध्यायाची सांगता!
आपल्या देशाला विश्वचषक जिंकून देणाऱ्या मेस्सीने आंतरराष्ट्रीय मैदानाला कायमचा रामराम ठोकल्याने जगभरातील फुटबॉलप्रेमी भावुक झाले आहेत. अखेरच्या सामन्यात गोल आणि लेकासोबतचे ते अश्रू यांसह एका जागतिक क्रीडा दंतकथेचा आंतरराष्ट्रीय प्रवास पूर्ण झाला.





