हॉकीपटू अशोक कुमार यांना जीवनगौरव
Updated On:

कोलकाता – हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचे चिरंजीव अशोक कुमार यांना प्रसिद्ध फुटबॉल क्लब मोहन बगानतर्फे देण्यात येत असलेला जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.
क्लबच्या स्थापना दिवसाचे औचित्य साधून क्लबने ऑनलाइन सोहळ्यात ही घोषणा केली. करोनाच्या धोक्यामुळे प्रत्यक्ष पुरस्कार वितरण कधी व कुठे करता येईल याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याचेही क्लबने जाहीर केले आहे. अशोक कुमार यांना सोशल मीडियावरील थेट कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.





