Pune District : जीवन सुंदर आहे, आनंद घ्या

ओतूर : प्रत्येक जण या जगात वेगळा आहे, युनिक आहे. स्वतःची ताकद आणि स्वतः बाची कमतरता ओळखा. चौकटी पलीकडे जाण्याचा प्रयत्न करून यशस्वी व्यावसायिक आणि उद्योजक होण्याचा प्रयत्न करा असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते प्रा. गणेश शिंदे यांनी केले.
ओतूर (ता. जुन्नर) येथील ग्राम विकास मंडळाच्या चैतन्य विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन प्रसंगी प्रा. शिंदे बोलत होते. याप्रसंगी नवी मुंबई येथील चैतन्य इलेक्ट्रिकल्स अँड सिव्हिल लेबर कॉन्ट्रॅक्टर शिवाजी डुंबरे, कल्पतरू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनल लिमिटेड नवी मुंबईचे डेप्युटी जनरल मॅनेजर मनोज गंभीर,
संस्थेचे अध्यक्ष अनिल तांबे, प्रभाकर तांबे, राजेंद्र डुंबरे, रघुनाथ तांबे, प्रदीप गाढवे, पंकज घोलप, प्रवीण जाधव, गौरव वायकर, प्रकाश तांबे, अमित डुंबरे, सचिन तांबे, सर्जेराव गाढवे, नितीन पाटील, वैभव तांबे, मोहित ढमाले, धनंजय डुंबरे, डॉ. गणपत डुंबरे प्रशांत डुंबरे, डॉ. मनीष वोरा, जयवंत डुंबरे, रोहिदास घुले, नितीन तांबे, अॅड. जयराम तांबे, अॅड. गोरख पानसरे, शिवाजी डुंबरे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका राजश्री भालेकर यांनी भाऊसाहेब खाडे यांनी सूत्रसंचालन तर संतोष सोनवणे यांनी आभार मानले.





