R Ashwin Retirement : अश्विनचा आयपीएलला अलविदा, गेम ऑफ ट्रेड-यूट्यूब चॅनल की सीएसकेशी मतभेद, खरं कारण काय आहे?

Why did R Ashwin retire from IPL : भारतीय क्रिकेट संघाचा माजी स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने बुधवारी, 27 ऑगस्ट 2025 रोजी आयपीएलमधून निवृत्ती जाहीर करत क्रिकेट विश्वात खळबळ उडवून दिली आहे. चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणाऱ्या अश्विनने स्पष्ट केले की, आता तो केवळ परदेशी टी-20 लीगमध्ये खेळताना दिसेल. निवृत्तीची घोषणा करताना त्याने “प्रत्येक अंत ही एका नव्या सुरुवातीचा मार्ग मोकळा करते” असे भावनिक उद्गार काढले. या वक्तव्यातून चाहते वेगवेगळे अर्थ काढत आहेत.
राहुल द्रविडसोबतच्या मुलाखतीत निवृत्तीचे संकेत –
नुकत्याच राहुल द्रविडसोबतच्या एका मुलाखतीत अश्विनने निवृत्तीच्या निर्णयाबाबत भाष्य केले होते. तो म्हणाला, “मी आता वयाने मोठा झालो आहे. सतत दौरे करणे आणि बराच वेळ बाहेर बसणे मला खटकू लागले होते. मी संघासाठी योगदान देऊ नये असे नाही, पण कधी कधी वाटते की, घरी मुलांसोबत वेळ घालवणे अधिक चांगले आहे. माझी मुलेही आता मोठी होत आहेत.”
Won the IPL in 2010👑
– Won the CLT20 in 2010.👑
– Won the IPL in 2011.👑
– Won the CLT20 in 2014.👑THANK YOU, RAVICHANDRAN ASHWIN – THE ULTIMATE CSKIAN 🥹💛
Happy Retirement Legend. This Homecoming Not Good But Still U Are Legend Of CSK 🥺💛#Ashanna #ashwin #RAshwin pic.twitter.com/LyHA8nC9yh
— DR Yadav (@DrYadav5197) August 27, 2025
पुढे तो म्हणाला, “मी इथे बसून काय करतोय? माझ्या मनात नेहमीच होते की, 34-35 व्या वर्षी निवृत्ती घ्यावी. पण सातत्याने खेळण्याची संधी न मिळाल्याने मी हा निर्णय घेतला.” या मुलाखतीतील त्याच्या वक्तव्यावरून चाहत्यांनी आयपीएलमधूनही निवृत्तीचे अंदाज बांधले होते. अश्विनच्या आयपीएलमधून निवृत्तीमागे अनेक कारणे असू शकतात, ज्याची चर्चा सध्या जोरात आहे.
हेही वाचा – थेट पोस्ट लिहिली अन्…; भारताच्या या मोठ्या खेळाडूने केली निवृत्तीची घोषणा! कारण काय?
निवृत्तीमागील संभाव्य कारणे –
1. यूट्यूब चॅनल आणि व्यापार : अश्विन गेल्या काही काळापासून आपल्या यूट्यूब चॅनलवर पूर्ण लक्ष केंद्रित करत आहे. इंग्रजी आणि हिंदी भाषेत चालणाऱ्या या चॅनलवर तो क्रिकेटविषयक चर्चा करतो. याशिवाय, आयपीएल 2026 साठी चेन्नई सुपर किंग्सने अश्विनला ट्रेड करण्याची अफवा पसरली होती. या अफवेमुळेही त्याच्या निवृत्तीच्या निर्णयाला बळ मिळाले असावे.
2. चेन्नई सुपर किंग्ससोबत वाद : अश्विन आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील वादाची चर्चाही समोर आली आहे. आयपीएल 2025 मध्ये अश्विनच्या दुखापतीनंतर डेवाल्ड ब्रेविसला संघात स्थान देण्यात आले होते. यावरून अश्विनने केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला होता. अश्विनने आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेल्याचे स्पष्ट केले, तर चेन्नई सुपर किंग्सने सर्व नियमांचे पालन केल्याचा दावा केला.
3. आयपीएल 2025 मधील निराशाजनक कामगिरी : आयपीएल 2025 मध्ये चेन्नई सुपर किंग्सने अश्विनला 9.75 कोटींना खरेदी केले होते. मात्र, त्याला अपेक्षेनुसार कामगिरी करता आली नाही. 9 सामन्यांत त्याने केवळ 7 विकेट्स घेतल्या, तर फलंदाजीतही केवळ 33 धावा केल्या. यामुळेही त्याने निवृत्तीचा विचार केला असावा. अश्विनच्या या अचानक निवृत्तीने चाहते आणि क्रिकेट विश्लेषकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. त्याच्या पुढील प्रवासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





