शिक्रापूर, (प्रतिनिधी) – ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र सभागृह होत असल्याची बाबत उल्लेखनीय असून ज्येष्ठ नागरिक संघाला आवश्यक ते सहकार्य करू, असे प्रतिपादन शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांनी केले आहे. शिक्रापूर (ता. शिरूर) येथे काही वर्षांपूर्वी ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन झाल्यानंतर ज्येष्ठ नागरिक संघाला स्वतंत्र सभागृह उभारुन देण्याची मागणी संघाने ग्रामपंचायतकडे केली असता अखेर ग्रामपंचायतच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक संघाला सभागृहासाठी जागा उपलब्ध करुन देण्यात आली. त्याचे काम लोकसहभागातून करण्यात येणार असताना त्या सभागृहाचे भूमिपूजन नुकतेच पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सरपंच रमेश गडदे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विठ्ठलराव सासवडे, कार्यकारिणी सदस्य गुलाबराव सासवडे, खजिनदार अर्जुन शिर्के, सचिव अशोक कुदळे, कार्याध्यक्ष शिवाजी मचे, दिनकर कळमकर, बाळासाहेब शेंडे, सोमनाथ भुजबळ, राजाभाऊ मांढरे, उत्तम गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य कृष्णा सासवडे, रमेश थोरात, बाबासाहेब सासवडे, सुरेश थिरे, पिंटू चव्हाण यांसह आदी उपस्थित होते, दरम्यान सोमनाथ भुजबळ यांनी प्रास्ताविक केले तर ज्येष्ठ नागरिक संघाचे कार्याध्यक्ष शिवाजी मचे यांनी आभार मानले.