Jambut News : भय इथले संपेना..! पिंपरखेडच्या आंबेवाडीत भरदिवसा बिबट्याचा थरार; नागरिकांमध्ये भीती
Jambut News : शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथील आंबेवाडी परिसरात भरदिवसा बिबट्या दिसून आल्याने स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे.

Jambut News : शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथील आंबेवाडी परिसरात भरदिवसा बिबट्या दिसून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुपारच्या सुमारास बिबट्या परिसरात फिरताना दिसल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, वनविभागाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. (Jambut News)
विशेष म्हणजे, नोव्हेंबर २०२५ मध्ये शालेय विद्यार्थी रोहन बोंबे यांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या घटनास्थळापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर हा बिबट्या दिसून आला. त्यामुळे आंबेवाडी तसेच जांबुत आणि परिसरातील नागरिकांमध्ये पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. (Jambut News)
मागील काही वर्षांत बिबट्यांच्या हल्ल्यांच्या घटना या परिसरात घडल्या असून, अनेक नागरिकांचा जीव गेल्याचा स्थानिकांचा दावा आहे. पिंपरखेड परिसराला बिबट प्रवण आणि अतिसंवेदनशील क्षेत्र म्हणून ओळखले जाते. (Jambut News)
रोहन बोंबे आणि शिवण्या बोंबे यांच्या मृत्यूनंतर नागरिकांनी आंदोलन केल्यानंतर वनविभागाकडून परिसरात मोठ्या प्रमाणात बिबटे जेरबंद करण्यात आले होते. मात्र, आता पुन्हा बिबट्यांचा वावर वाढल्याची भीती नागरिकांकडून व्यक्त होत आहे. (Jambut News)
पिंजऱ्यांना बिबट्याचा चकवा?
बिबट्या दिसल्यानंतर वनविभागाकडून परिसरात पिंजरे लावले जातात. या पिंजऱ्यांमध्ये कोंबडीसारखे भक्ष ठेवले जाते. मात्र, बिबटे पिंजऱ्यात न अडकता आजूबाजूच्या परिसरातून निघून जात असल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. (Jambut News)
मागील घटनांचे गांभीर्य लक्षात घेता, कोणतीही अनुचित घटना घडण्यापूर्वी वनविभागाने तांत्रिक पद्धतीने तसेच वन्यजीव तज्ज्ञांच्या मदतीने बिबट्यांचा शोध घेऊन त्यांना जेरबंद करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच परिसरात रात्रीची गस्त वाढवावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. (Jambut News)
वनविभागाकडून तातडीच्या उपाययोजनांचे आश्वासन
जुन्नरचे उपवनसंरक्षक प्रशांत खाडे यांच्याशी संपर्क साधला असता, या अतिसंवेदनशील भागात बिबट्यांचा वाढता वावर लक्षात घेऊन संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. (Jambut News)
यापुढे अशा प्रकारची दुर्घटना घडू नये, यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, बिबट्याचा वावर असलेल्या काळात नागरिकांनी तसेच शालेय विद्यार्थ्यांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.
Jambut News : शिरूर तालुक्यात कृषीपंप चोरांचा धुमाकूळ; पोलिसांच्या कारवाईकडे लक्ष
Jambut News : बिबट्याच्या हल्ल्यात नऊ जणांचा बळी; संतप्त ग्रामस्थांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी

