#Video | भोर-महाड मार्गावरील वरंधा घाटात बिबट्याचा वावर

Updated On:

भोर (प्रतिनिधी) :– भोर-महाड मार्गावरील वरंधा घाटातील घनदाट जंगल परिसरात बिबट्याचा दिवासा ढवळ्या वावर आसल्याचे समोर आले असून वरंधा घाटातील महाडच्या हद्दीत घाट रस्त्याने प्रवास करणाऱ्या अनेकांना बिबट्याचे दर्शन झाले असून त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

वरंधा घाट परिसरात बिबट्याचा वावर असल्याच्या अनेक घटनांवरुन स्पष्ट झाले असल्याने या घाट मार्गावरुन प्रवास करणाऱ्या आणि पावसाळ्याचे दिवसांत धबधब्यांचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांनी सावधानता बाळगावी असे आवाहन भोरच्या उप विभागीय वनाधिकारी आशा भोंग व वन परिक्षेञ अधिकारी दत्ताञय मिसाळ यांनी केले आहे.

वरधा घाटात दिसलेला बिबट्या हा काही एकाच जागी थांबत नाही तो भक्षाच्या शोधात डोंगररानातील जंगलात फिरत असतो. वन विभागाने तीन दिवसांपासून घाट मार्गावार पेट्रोलिंग सुरु केले असून वन विभागाचे कर्मचारी बिबटयाचा माग घेत आहेत. घाट मार्गावारील गावकऱ्यांना या विषयी सावधानता बाळगण्याचे आवाहन केले असून त्यांच्या पशु धनाचे जर काही नुकसान झाले, मानवी हल्ला झाला तर वनविभागाकडून नुकसान भरपाई दिली जाते असे वन परिक्षेञ अधिकारी दत्ताञय मिसाळ यांनी या विषयी माहिती देताना सांगितले.

वरंधा घाटातील बिबट्याचे दर्शनाने वरंधा घाट भागातील गावातील नागरिकांमध्ये आणि कोकणात जाणारे येणारे प्रवाशी, पर्यटकांमध्ये भितीचे वातारण निर्माण झाले आहे. या आनुषंगाने भोर विधानसभा मतदार संघाचे आमदार संग्राम थोपटे यांनी राजगाड साखर कारखाना स्थळावर उप विभागीय वनाधिकारी आशा भोंग यांचेशी तातडीची बैठक घेवुन पशुधनाची आणि नागरीकांच्या जीवाची बिबट्या कडून हानी होणार नाही याची दक्षता घ्यावी आशा सूचना दिल्या आहेत.

बिबट्या हा एकाच ठिकाणी थांबत नसल्याने लोकांनी घाबरुन जावू नये , वन विभागा कडून योग्य ती खबरदारी घेतली जात आसल्याचे उप विभागीय वनाधिकारी आशा भोंग यांनी यावेळी सांगीतले.

आणखी संबंधित बातम्या

Shirur : शिरूरमध्ये गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य; विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा होणार सन्मान

2026-10-08 22:25:36

Shirur : शिरूरमध्ये गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य; विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा होणार सन्मान

Pune : दादावाला करंडकात लोकनृत्यांचा रंग; 32 शाळा-महाविद्यालयांचा उत्स्फूर्त सहभाग

2026-10-08 19:09:16

Pune : दादावाला करंडकात लोकनृत्यांचा रंग; 32 शाळा-महाविद्यालयांचा उत्स्फूर्त सहभाग

Nana Patekar Funeral: अभिनयाचा बुलंद आवाज शांत! नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुण्यात शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

2026-10-08 09:50:15

Nana Patekar Funeral:  अभिनयाचा बुलंद आवाज शांत! नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुण्यात शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

FDA: डिटर्जंट, केमिकल वापरून भेसळ ; पुणे विभागात एफडीएकडून दूध संस्‍थांना दणका

2026-10-08 07:48:38

FDA: डिटर्जंट, केमिकल वापरून भेसळ ; पुणे विभागात एफडीएकडून दूध संस्‍थांना दणका

Katraj-Kondhwa: मध्यरात्री पोकलेन-ब्रेकरचा दणदणाट

2026-10-08 07:27:57

Katraj-Kondhwa: मध्यरात्री पोकलेन-ब्रेकरचा दणदणाट