अहिनवेवाडी रस्त्यावर बिबट्याचा मोटरसायकलवर हल्ल ; एक जण जखमी
Updated On:

उदापूर : अहिल्यानगर-कल्याण महामार्गावरील राज लॉन्स, अहिनवेवाडी फाट्याजवळ बुधवारी (१५ ऑक्टोबर) रात्री ८ वाजण्याच्या सुमारास एका बिबट्याने मोटारसायकलस्वारावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. या घटनेत शांताराम भूतांबरे (रा. धावशी ता. जुन्नर) हे जखमी झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी कि, अहिनवेवाडी फाट्यावरून शांताराम भूतांबरे आणि त्यांचे मित्र हे दोघेजण मोटारसायकल वरून धावशी कडे जात होते. रात्री ८ च्या सुमारास अचानक बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला.
या हल्ल्यात शांताराम भूतांबरे हे जखमी झाले असून त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून नारायणगाव येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याची माहिती वनविभागाचे वनपाल विश्वनाथ बेले, सारिका बुट्टे यांनी दिली.





