प्रभात वृत्तसेवा राजुरी – राजुरी येथे शाळेतून घरी जात असताना शालेय विद्यार्थ्यांवर बिबट्याने केला हल्ला, विद्यार्थ्यांच्या पाठीमागून घरचा कुत्रा मोती येत होता. बिबट्याने केलेला हल्ल कुत्र्याने पाहताच बिबट्यावरती केला प्रतिहल्ला केला सुदैवाने शाळकरी विद्यार्थी वाचला.याबाबतची अधिक माहिती अशी राजुरी (ता. जुन्नर) येथील धनेश बाळू औटी (वय13)हा विद्यार्थी इयत्ता आठवी शिकत असून राजुरी गावातील विद्या विकास मंदिर माध्यमिक विद्यालयातून शाळा सुटल्यानंतर सोमवार (दि. 3) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारात घरी जात असताना लळईमळा शिवारातील रस्त्याने चालला होता. रस्त्याच्या कडेला असलेल्या कापसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने धनेश या विद्यार्थ्यावर हल्ला केला. मात्र पाठीमागून येणारा घरचा राखणदार मोती हा कुत्रा पाठीमागून येत होता. बिबट्याने केलेल्या हल्ला पाहताच मोती कुत्र्याने बिबट्यावरती प्रति हल्ला केला. कुत्र्याच्या प्रतिहल्ल्याने बिबट्याने तेथून पळ काढला, सुदैवाने विघ्नेश हा विद्यार्थी सुदैवाने वाचला. या परिसरामध्ये बिबट्याचा रस्त्यांवर वावर वाढला आहे. अनेक वेळा दुचाकी वाहनांना बिबट्या आडवा जात आहे. पादचारी रस्त्याने जात असताना भीतीच्या वातावरणात प्रवास करावा लागत असल्यामुळे वन विभागाने याचे गांभीर्य लक्षात घेऊन या परिसरात पिंजरे लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी गणेश सहकारी दूध व्यवसायिक संस्थेचे माजी चेअरमन बाळासाहेब हाडवळे यांनी केली.