Lehra Do Tiranga: cjp च्या ‘तिरंगा यात्रे’वर भाजपचे मोठे वक्तव्य, ‘चांगली गोष्ट आहे, पण…’
Lehra Do Tiranga:

Lehra Do Tiranga: कॉकरोच जनता पक्षाचे (सीजेपी) संस्थापक अभिजीत दीपके यांनी दिल्लीतील कनॉट प्लेस मधील सेंट्रल पार्कमध्ये ‘तिरंगा फडकावण्याचा’ कार्यक्रम जाहीर केला आहे. ही तिरंगा यात्रा उद्या, १६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता होणार आहे. यावर आता भाजपने प्रतिक्रिया दिली आहे. भाजप खासदार संजय जयस्वाल यांनी सीजेपीला सल्ला दिला आहे.
खासदार संजय जयस्वाल बिहारमधील बेतिया याठिकाणी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सीजेपीच्या प्रस्तावित तिरंगा यात्रेसंदर्भात म्हणाले, “ही एक चांगली गोष्ट आहे, पण भारतीयांचा आणि भारतीय ध्वजाचा आदर करा, भारताच्या नागरिकांचा आदर करा आणि देशाच्या शांततापूर्ण प्रगतीच्या क्षमतेचा आदर करा. कोणत्याही परकीय शक्तींच्या अजेंड्याच्या प्रभावाखाली काहीही केले जाऊ नये.”
“एसआयआरमध्ये कोणालाही दोष आढळला नाही” Lehra Do Tiranga:
विरोधी पक्ष सध्या मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि एसआयआर प्रक्रियेवर नाराज आहेत. आंदोलने सुरू आहेत. संजय जयस्वाल यांनी यावर स्पष्टीकरण देताना सांगितले की, “आजपर्यंत एसआयआरमध्ये (SIR) कोणालाही एकही चूक सापडलेली नाही. विरोधकांनी केलेल्या सर्व आरोपांमधील चुकांना निवडणूक आयोगाने (ECI) उत्तर दिले आहे.
बेतिया, बिहार: बीजेपी सांसद संजय जायसवाल ने CJP की प्रस्तावित तिरंगा यात्रा पर कहा, “अच्छी बात है, भारतीय और भारत के झंडे के प्रति सम्मान रखें, भारत के नागरिकों के प्रति सम्मान रखें, ये देश शांति से आगे बढ़ सके, उसके प्रति सम्मान रखें। किसी विदेशी ताकतों के एजेंडे में आकर कोई काम नहीं होना चाहिए। SIR में एक गलती आज तक कोई नहीं निकाल सका है, जितनी भी गलतियां उन्होंने बोली थीं, सभी चीजों का जवाब ECI ने उन्हें दिया है…”
— IANS Hindi (@IANSKhabar) October 15, 2026
संजय जयस्वाल यांचा काँग्रेसवर हल्ला
संजय जयस्वाल यांनी काँग्रेसवरही हल्ला चढवला. ते म्हणाले की, देशद्रोही शक्तींशी संगनमत करून काहीही साध्य होणार नाही. जनतेला हे चांगलेच माहीत आहे, म्हणूनच प्रत्येक पोटनिवडणुकीत, प्रत्येक नगर परिषद निवडणुकीत आणि प्रत्येक महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसचा सफाया होत आहे.
अभिजीत दीपके यांची संपूर्ण योजना काय आहे? Lehra Do Tiranga:
सीजेपी नेते सौरव दास आणि आशुतोष रांका यांनी जंतर मंतरवर तिरंगा फडकवला होता, ज्यानंतर त्यांना पाच दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत तुरुंगात पाठवण्यात आले आहे.
गेल्या बुधवारी अभिजीत दीपके दिल्लीत दाखल झाले. यानंतर त्यांनी लोकांना १६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता तिरंगा घेऊन सीपीच्या सेंट्रल पार्कमध्ये येण्याचे आवाहन केले. आम्ही तिथे आमचा तिरंगा फडकवू आणि तुम्हाला सांगू इच्छितो की तिरंगा फडकवणे हा गुन्हा नाही. जे दिल्लीला येऊ शकत नाहीत, त्यांनी आपापल्या शहरांमध्ये तिरंगा मोर्चे आयोजित करावेत, असेही ते म्हणाले.





