Asha Bhosle Passed Away : स्वरसम्राज्ञी आशा भोसले कालवश!’ब्रेट ली’सोबतच्या त्या गाण्यापासून ‘सचिन’च्या मैत्रीपर्यंत, क्रिकेटशी होतं खास नातं
Asha Bhosle Passed Away : ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी मुंबईत निधन झाले. त्यांच्या निधनाने केवळ संगीत क्षेत्रच नव्हे, तर क्रिकेट विश्वही हळहळले आहे.

Asha Bhosle passed away at 92 : भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज पार्श्वगायिका आशा भोसले यांनी रविवारी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. रुग्णालयाचे डॉक्टर प्रतीत समदानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘मल्टी ऑर्गन फेल्युअर’मुळे (अनेक अवयव निकामी झाल्यामुळे) त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात मुलगा आनंद आणि त्यांचे कुटुंब आहे.
क्रिकेट विश्वाशी राहिले जिव्हाळ्याचे नाते –
Remember this when Asha Ji and Brett Lee made music together.
An era doesn’t end it echoes forever.
Thank you for the timeless melodies #AshaBhosle ji.Om Shanti 🙏 pic.twitter.com/mZY57TFDKM
— Akul (𝑨𝑻10) (@Loyalsachfan10) April 12, 2026
आशाताईंचे क्रिकेटवर प्रचंड प्रेम होते. २००६ च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान त्यांनी ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली याच्यासोबत ‘यू आर द वन’ हे गाणे गायले होते. स्वतः ब्रेट लीने लिहिलेले हे गाणे आजही यूट्यूबवर लोकप्रिय आहे. तसेच, क्रिकेटचा देव मानला जाणारा सचिन तेंडुलकर हा आशाताईंचा मोठा चाहता होता. आशाताई त्याला ‘क्रिकेटमधील सर्वात मोठा कलाकार’ मानत असत. अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सचिन आणि आशाताईंची खास मैत्री पाहायला मिळायची.
A deeply sad day for India, and for music lovers across the world.
For us, Asha Tai was family. Today, words feel too small for the loss we feel. One moment the heart falls silent, and the next, it drifts through the countless melodies she gifted all of us.
It feels as…
— Sachin Tendulkar (@sachin_rt) April 12, 2026
संगीत प्रवासाचा सुवर्णकाळ –
Deeply saddened by the passing of Asha Bhosle Ji, one of the most iconic and versatile voices India has ever known. Her extraordinary musical journey, spanning decades, enriched our cultural heritage and touched countless hearts across the world. Be it her soulful melodies or… pic.twitter.com/SbFrzf1Meu
— Narendra Modi (@narendramodi) April 12, 2026
आशा भोसले यांनी २० हून अधिक भाषांमध्ये १२,००० हून अधिक गाणी गायली. ‘पिया तू अब तो आजा’, ‘दम मारो दम’, ‘ये मेरा दिल’ आणि ‘चुरा लिया है तुमने’ यांसारख्या गाण्यांनी त्यांनी अनेक पिढ्यांचे मनोरंजन केले. त्यांच्या महान कार्यासाठी त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार, पद्मविभूषण, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि फिल्मफेयर अशा बऱ्याच पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.
राजकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार –
आशाताईंचे पार्थिव सोमवारी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत अंतिम दर्शनासाठी ठेवले जाईल. त्यानंतर दुपारी ४ वाजता दादर येथील शिवाजी पार्क येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील.





