मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात LPG प्लांट मध्ये गळती; अग्निशमन दलाची टीम दाखल
Updated On:

मुंबई- मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात LPG प्लांटमध्ये गळती झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेची माहिती मिळल्यावर तात्काळ घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 9 गाड्या दाखल झाल्या आहेत.
रुग्णांलयातील रुग्णांना दुसऱ्या इमारतीत हलवण्यात आले आहे. सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही आहे. मुंबई महापालिकेच्या डिझास्टर कंट्रोल बोर्डाला यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.
रुग्णांलयात ही गॅस गळती नेमंकी कशामुळे झाली हे अद्याप समोर आले नाही. गॅस गळती झालेल्या ठिकाणी रुग्णांची संख्या कमी असून या रुग्णांना तात्काळ दुसऱ्या इमारतीत हलविण्यात आले आहे.





