“इंडिया आघाडीचे नेतृत्व ममतांच्या हाती द्यावी”; लालू प्रसाद यादव यांचा काँग्रेसला झटका

Lalu Prasad Yadav | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीचे नेतृत्व करण्याची ऑफर दिल्यापासून विरोधी नेत्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. यातच आता लालू प्रसाद यादव यांनी ममता बॅनर्जी यांना पाठिंबा दिला आहे.
लोकसभा निवडणुकीपासून इंडिया आघाडीत ताळमेळ नसल्याचे दिसत आहे. हरयाणात काँग्रेसने मित्रपक्षांना दूर ठेवले. त्यापाठोपाठ महाराष्ट्रातही विधानसभा निवडणुकीत याचा मोठा फटका बसला. त्यामुळे आता नेतृत्व बदलण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
‘ममता बॅनर्जींना इंडिया आघाडीच्या नेत्या म्हणून निवडले पाहिजे’
“पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना इंडिया आघाडीच्या नेत्या म्हणून निवडले पाहिजे. काँग्रेसच्या विरोधाला अर्थ नाही. ममतांनाच नेता बनवलं पाहिजे”, असे लालू प्रसाद यादव म्हणाले. बिहारमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राजद सत्तेत येणार, असा दावाही त्यांनी यावेळी केला. Lalu Prasad Yadav |
तर काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही यावर प्रतिक्रिया दिली होती. टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी यांनी विरोधी आघाडीत अधिक जबाबदारी घेतल्यास मला आनंद होईल, असे त्यांनी सांगितले होते.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नुकत्याच झालेल्या हरियाणा आणि महाराष्ट्र निवडणुकीत इंडिया आघाडीच्या खराब कामगिरीबद्दल नाराजी व्यक्त केली होती आणि संधी दिल्यास त्या इंडिया आघाडीची जबाबदारी घेण्यास तयार असल्याचे संकेत दिले होते.
ममता बॅनर्जी काय म्हणाल्या होत्या ?
काही दिवसांपूर्वीच ममता बॅनर्जी यांनी “मी इंडिया आघाडीची स्थापना केली होती. आता आघाडीचे नेतृत्व करणाऱ्यांवर ती नीट चालवण्याची जबाबदारी आहे. ते चालवत नसतील, तर त्याला मी काय करू शकते. जर मला संधी दिली तर मी इंडिया आघाडी व्यवस्थित काम कशी करेल हे निश्चित करेल. मला बंगालबाहेर जायची इच्छा नाही, पण मी इथून नेतृत्व करू शकते”, असेही त्या म्हणाल्या होत्या. Lalu Prasad Yadav |
हेही वाचा:
मलायका अरोरा पुन्हा प्रेमात? मिस्ट्रीमॅन सोबतच्या फोटोंमुळे चर्चांना उधाण





