Mamata Banerjee : ‘कॉकरोच जनता पार्टी’ला ममता बॅनर्जी यांचा पाठिंबा; काय म्हणाल्या? पाहा…
२१ मे रोजी त्यांचे मूळ सोशल मिडिया हँडल भारतात ब्लॉक केल्यानंतर त्यांनी Cockroach is Back या नवीन हँडलसह पुनरागमन केले आहे, ज्याचे सध्या २,२७,००० हून अधिक फॉलोअर्स आहेत.

Mamata Banerjee | Cockroach Janata Party – तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी (Mamata Banerjee ) आणि अभिषेक बॅनर्जी यांनी कॉकरोच जनता पार्टी या उपहासात्मक सोशल मीडिया चळवळीला आपला पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे, अशी माहिती टीएमसीचे राज्यसभा नेते डेरेक ओ’ब्रायन यांनी सोमवारी दिली.
‘डेरेक ओ’ब्रायन यांनी अधिकृत सोशल मिडियावर पोस्ट करत म्हटले की, ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांच्यासोबत आठवडाभर विविध धोरणात्मक बैठका झाल्या. दोघेही जनहिताचा न्याय्य लढा लढण्यावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करून आहेत.
आणि हो, त्या दोघांनीही कॉकरोचेस चळवळीबद्दल आपली पसंती आणि पूर्ण पाठिंबा व्यक्त केला असल्याचे त्यांनी सांगितले. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पक्षाच्या भविष्यातील दिशेबाबत बॅनर्जी सध्या वरिष्ठ नेत्यांसोबत आढावा बैठका घेत आहेत. ( Mamata Banerjee)
बोस्टनस्थित अभिजीत दिपके यांनी १६ मे रोजी कॉकरोच जनता पार्टी या डिजिटल गटाची स्थापना केली. भारताचे सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी बेरोजगार तरुणांविषयी केलेल्या एका कथित टिप्पणीच्या निषेधार्थ या अनोख्या गटाचा उदय झाला. (Mamata Banerjee)
या डिजिटल ग्रुपने नीट परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणावरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan )यांच्या राजीनाम्याची मागणी करत मोठी मोहीम उघडली आहे.
सरकारकडून दडपशाही : (Mamata Banerjee)
अभिजित दिपके यांनी आरोप केला की, सरकारकडून त्यांच्या या चळवळीवर दडपशाही केली जात असून त्यांची सोशल मीडिया खाती ब्लॉक केली जात आहेत.
२१ मे रोजी त्यांचे मूळ सोशल मिडिया हँडल भारतात ब्लॉक केल्यानंतर त्यांनी Cockroach is Back या नवीन हँडलसह पुनरागमन केले आहे, ज्याचे सध्या २,२७,००० हून अधिक फॉलोअर्स आहेत. या अपारंपरिक निषेध पद्धतीला आता टीएमसीनेही पाठिंबा दिल्याने हा विषय अधिक चर्चेत आला आहे.






