लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या मुलीने केले फोटोशूट, ग्लॅमरस अंदाज पाहून चाहते झाले घायाळ

मुंबई – मराठीतील दिवंगत दिग्गज अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांची कन्या स्वानंदी बेर्डे हिने देखील आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेऊन आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. यासाठी तिने चित्रपट नाही तर नाटकाची निवड केली. लक्ष्मीकांत बेर्डे यांनी देखील आपल्या अभिनयाची सुरुवात नाटकांमधून केली होती. स्वानंदी सध्या आपल्या एका होत फोटोशूटमुळे चांगलीच चर्चेत आली आहे.
स्वानंदीने नुकतेच एक फोटोशूट केले आहे. ज्यात ती अप्रतिम ड्रेसमध्ये फार सुंदर दिसत आहे. स्वानंदीने यावेळी हाफ व्हाईट कलरचा लेहेंगा परिधान केलेला आहे. त्यासोबतच तिने आकर्षक ओढणी देखील घेतल्याचे दिसून येते. यावेळी स्वानंदीने दिलेल्या वेगवेगळ्या पोज तीच सौंदर्य आणखी खुलवत आहेत. सोशल मीडियावर शेअर केलेल्या या फोटोंना चाहते भरभरून प्रेम देत आहेत.
View this post on Instagram
स्वानंदी सध्या धनंजय माने इथेच राहतात का ? हे नाटक करते. तिने हे फोटोशूट नेमकं कशासाठी केलं हे अद्याप स्पष्ट नसलं तरी चाहत्यांना तिला मोठ्या पडद्यावर पाहण्याची प्रचंड उत्सुकता आहे. आई वडिलांकडून अभिनयाचा प्रगल्भ वारसा तिला प्राप्त असल्यामुळे चाहते देखील तिच्या या फोटोंवर हार्ट पोस्ट करत तिचे कौतुक केले आहे.



