Laxman Hake FIR | बारामतीत OBC एल्गार मेळावा ; लक्ष्मण हाके यांच्यासह १४ जणांवर गुन्हे दाखल

प्रभात वृत्तसेवा
बारामती – बारामती शहरात झालेल्या ओबीसी एल्गार मेळाव्यातील ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यासह १४ आंदोलकांवर बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.शासनाने मराठा आरक्षणासंदर्भात काढलेल्या जीआरच्या विरोधात बारामती शहरात एल्गार मेळाव्याचे आयोजन ओबीसी समाजाच्या वतीने करण्यात आले होते. बारामती शहरात ओबीसी समाजाने वज्रमूठ बांधत शासन निर्णयाविरोधात निषेध नोंदवला. या एल्गार मेळाव्यास पोलिसांनी परवानगी नाकारली होती.
तरी देखील ओबीसी समाजाने एकत्र येत हा मेळावा आयोजित केला. त्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यासह चंद्रकांत वाघमोडे, अमोल सातकर, पांडुरंग मेरगळ, नवनाथ पडळकर, बापूराव सोलनकर, किशोर मासाळ, किशोर हिंगणे, गोविंद देवकाते, विठ्ठल देवकाते, काळूराम चौधरी, ज्ञानेश्वर कवले, ॲड. मंगेश ससाणे, ॲड. जी. बी. गावडे या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.





