मस्तच! फक्त 26 रुपयात खरेदी करा स्मार्टवॉच आणि इयरबड्स, ‘या’ कंपनीने केली सेलची घोषणा

Smartwatch Offer: भारतात स्मार्टवॉच वापरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. कंपन्यांकडून देखील ग्राहकांची मागणी पाहता अनेक शानदार स्मार्टवॉच सादर केल्या जात आहेत. आता Lava ने रिपब्लिक डे सेलची घोषणा केली असून, या सेलमध्ये Lava च्या स्मार्टवॉच आणि इयरबड्सला केवळ 26 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे.
लावाच्या सेलमध्ये ProWatch ZN आणि Probuds T24 ला फक्त 26 रुपयात खरेदी करता येईल. ProWatch ZN आणि Probuds T24 ची क्रमशः किंमत 2599 रुपये आणि 1299 रुपये आहे. मात्र, लक्षात घ्या की ही ऑफर केवळ सुरुवातीच्या 100 यूनिट्ससाठी आहे. सेल सुरू झाल्यानंतर ProWatch ZN आणि Probuds T24 च्या 100 यूनिट्सला फक्त 26 रुपयात खरेदी करता येईल.
लावाच्या या सेलला 26 जानेवारी 2025 ला सुरुवात झाली आहे. कंपनीच्या स्मार्टवॉच आणि इयरबड्सवर 76 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळेल.
ProWatch ZN स्मार्टवॉचच्या फीचर्सबद्दल सांगायचे तर 1.43 इंच एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 देण्यात आला आहे. या वॉचला एकदा चार्ज केल्यावर 7 दिवस वापरू शकता. यामध्ये SpO2, स्लीप ट्रॅकिंग आणि हार्ट रेट मॉनिटरिंग सारखे फीचर्स देण्यात आले आहे.
याशिवाय, काही दिवसांपूर्वीच लाँच झालेल्या Probuds T24 वर देखील बंपर डिस्काउंट उपलब्ध आहे. हे बड्स 10mm ड्राइव्हरसह येतात. यामध्ये शानदार साउंड क्वालिटी देण्यात आली आहे. याशिवाय, यात क्वाड माइक ENC टेक्नोलॉजी देण्यात आली आहे.





