भारतीय कंपनीची भन्नाट स्मार्टवॉच लाँच, 10 दिवसांची बॅटरी लाइफ-हेल्थ फीचर्ससह मिळेल बरंच काही, जाणून घ्या किंमत

ProWatch X Launched | Lava चा सबब्रँड असलेल्या ProWatch ने नवीन स्मार्टवॉच ProWatch X ला लाँच केले आहे. 5 हजार रुपयांच्या बजेटमध्ये येणाऱ्या या वॉचमध्ये अनेक शानदार फीचर्स देण्यात आले आहे. 1.43 इंच एमोलेड डिस्प्लेसह अनेक शानदार हेल्थ फीचर्स यात मिळतील. ProWatch X च्या किंमत आणि फीचर्सविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
ProWatch X चे फीचर्स
ProWatch X मध्ये कंपनीने 1.43 इंच AMOLED डिस्प्ले दिला असून, यात अॅल्युमिनियम अलॉय फ्रेम मिळेल. स्क्रिनच्या सुरक्षेसाठी Corning Gorilla Glass मिळेल. वॉचमध्ये ATD3085C प्रोसेसर दिला आहे. ही वॉच iOS आणि Android दोन्ही प्लॅटफॉर्मवर काम करते.
या वॉचमध्ये हेल्थ ट्रॅकिंग फीचर्स, SpO2 मॉनिटरिंग आणि हार्ट रेट ट्रॅकिंग यासारखे फीचर्स मिळतात. हे डिव्हाइस HX3960 PPG सेन्सॉर सोबत येते, ज्याचा वापर हार्ट रेट आणि SpO2 मॉनिटरिंगसाठी केला जातो. कनेक्टिव्हिटीसाठी जीपीएस आणि ब्लूटूथ फीचर मिळतील.
यात 110 स्पोर्ट्स मोड्स उपलब्ध आहेत. वॉचमध्ये 300mAh बॅटरी दिली असून, कंपनीचा दावा आहे की, एकदा चार्ज केल्यावर या वॉचला 10 दिवस वापरू शकता. यात पोस्ट वर्कआउट रिकव्हरी अॅनालिसिस, SpO2 मॉनिटरिंग, स्लीप ट्रॅकिंग आणि ब्रीदिंग एक्सरसाइज यासारखे फीचर्सही मिळतील. पाणी आणि धुळीपासून सुरक्षेसाठी वॉचला IP68 रेटिंग मिळाले आहे.
Prowatch X ची किंमत
Prowatch X ला कंपनीने 4,499 रुपये किंमतीत लाँच केले आहे. 8 फेब्रुवारीपर्यंत वॉच प्रीऑर्डरसाठी उपलब्ध असेल. ही स्मार्टवॉच खरेदी करताना डेबिट/क्रेडिट कार्डचा वापर केल्यास 1 हजार रुपयांची बचत देखील होईल. वॉच 21 फेब्रुवारीपासून ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर खरेदीसाठी उपलब्ध असेल.





