Laura Wolvaardt praises Shafali Verma : महिला वनडे वर्ल्ड कप 2025 च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला भारतीय संघाकडून 52 धावांनी पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वूल्वार्टने प्रतिक्रिया दिली. लॉरा वूल्वार्टने प्रतिक्रिया देताना आपल्या संघाच्या पराभवाचे मोठे कारण सांगितले आहे. तिने 21 वर्षीय भारतीय फलंदाज शफाली वर्मा हिच्या गोलंदाजीचे विशेष कौतुक करत हा खुलासा केला. शफालीच्या गोलंदाजीमुळेच सामना गमावला – सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत लॉरा वूल्वार्टने शफाली वर्माच्या गोलंदाजीवर आश्चर्य व्यक्त केले. ती म्हणाली, “मला अजिबात अपेक्षा नव्हती की शफाली आज जास्त गोलंदाजी करेल, त्यामुळे तिला गोलंदाजी करताना पाहून आम्हाला धक्काच बसला. तिने विकेट टू विकेट आणि खूप धीम्या गतीने गोलंदाजी केली. याच कारणामुळे तिला दोन महत्त्वाच्या विकेट्स मिळाल्या.” लॉरा वूल्वार्ट पुढे म्हणाले, “वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये तुम्ही कोणत्याही पार्ट-टाईम गोलंदाजाविरुद्ध विकेट्स देऊ इच्छित नाही, पण निराशाजनक गोष्ट ही आहे की आम्ही तिच्याविरुद्ध दोन विकेट्स गमावल्या. तिच्या या गोलंदाजीमुळेच आम्ही सामन्यात पिछाडीवर पडलो आणि अखेरीस आम्हाला पराभवाचा सामना करावा लागला.” हेही वाचा – Indian Womens Team : विश्वविजेत्या महिला संघावर पैशांचा वर्षाव! ICC आणि BCCI च्या बक्षीसानंतर हिऱ्यांचे हार मिळणार गिफ्ट शफाली ‘पार्ट-टाईम’ गोलंदाजी ठरली ‘गेम चेंजर’ – महत्त्वाची बाब म्हणजे, या सामन्यात शफालीने तिच्या पहिल्याच स्पेलमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या दोन महत्त्वाच्या फलंदाज, सुने लुस आणि मारिजेन कॅप्प यांना बाद करून आफ्रिकेच्या संघाला बॅकफूटवर ढकलले. या सामन्यापूर्वी 21 वर्षीय शफालीने तिच्या संपूर्ण वनडे कारकिर्दीत फक्त 14 षटके गोलंदाजी केली होती. मात्र, अंतिम सामन्यात कर्णधार हरमनप्रीत कौरने तिच्यावर विश्वास दाखवला आणि तिने गोलंदाजीत जबरदस्त कामगिरी केली. हेही वाचा – IND vs AUS : ट्रॅव्हिस हेड भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेतून बाहेर! नेमकं कारण काय? घ्या जाणून हरमनप्रीत कौरकडूनही कौतुक – शफालीच्या गोलंदाजी देण्याच्य निर्णयाबद्दल बोलताना कर्णधार हरमनप्रीत कौर म्हणाली, “जेव्हा लॉरा वूल्वार्ट आणि सुने लुस खूप चांगली फलंदाजी करत होत्या, तेव्हा मी शफालीकडे पाहिले. तिने जशी फलंदाजी केली होती, मला माहित होते की आजचा दिवस तिचा आहे. ती आज काहीतरी खास करत होती आणि मला वाटले की मी माझ्या गट फीलिंगसोबत जायला हवे.”