पुणे – व्यंकटेश एरंडवणे सेंट्रल या वेंकटेश बिल्डकॉनच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे एका भव्य समारंभात उदघाटन झाले. सीडीएसएस या एरंडवण्यातील सर्वोत्तम लोकेशनवर असलेल्या व्यंकटेश एरंडवणे सेंट्रल हा उच्चभ्रू प्रकल्प म्हणजे पुणे 4 मधील प्लुटोक्रसीचे उत्तुंग प्रतीक आहे.
यावेळी महाराष्ट्र राज्य भाजपचे अध्यक्ष, आ. चंद्रकांतदादा पाटील, विद्यमान राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, माजी सहकार मंत्री सुभाषबापू देशमुख, क्रेडाई इंडियाचे अध्यक्ष व मगरपट्टा डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक सतीश मगर, आ. भीमराव तापकीर, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, एमबीव्हीएचे संस्थापक अध्यक्ष एस. आर. कुलकर्णी, आयओबी बॅंकेचे एस. गोपाल, एसबीआयचे निवृत्त मुख्य महाप्रबंधक अरविंद मोकाशी उपस्थित होते.
व्यंकटेश बिल्डकॉनचे व्यवस्थापकीय संचालक अंकुश आसबे व लहुराज आसबे यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सतीश मगर यांनी रिअल इस्टेट क्षेत्रातील सध्याच्या परिस्थितीबद्दल माहिती देऊन व्यंकटेश एरंडवणे सेंट्रलच्या निर्मितीला दाद दिली. व्यंकटेश एरंडवणे सेंट्रल हा 400 सदनिकांची कम्युनिटी असलेला प्रकल्प आहे.
उत्तम कनेक्टिव्हिटी, दर्जेदार सुविधा, शहराचे नयनरम्य दृश्य व आकर्षक जीवनशैली ही एरंडवण्यातील अप्रतिम लोकेशनवर असलेल्या या प्रकल्पाची वैशिष्टये आहेत. व्यंकटेश एरंडवणे सेंट्रल ही 4.5 एकर्सवरची 30 हून अधिक मजली इमारतींची निर्मिती आहे. जिम, पार्टी लॉन, हॉट फूट एरिया, अशा 25 हून अधिक अत्याधुनिक सुविधा प्रकल्पात आहेत.