दुर्दैवी ! ऊसाच्या ट्रॅक्टरखाली चिरडून मुलाचा जागीच मृत्यू
Updated On:

लातूर – औसा तालुक्यातील लिंबाळा दाऊ येथे ऊसाच्या ट्रॅक्टरखाली चिरडून 13 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. कृष्णा भानुदास शिंदे असे मृत्यू पावलेल्या मुलाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लिंबाळा दाऊ येथून दुपारच्या वेळी ऊसाने भरलेले ट्रॅक्टर कारखान्याकडे जात होते. यावेळी कृष्णा चालू ट्रॅक्टवर चढत असताना त्याचा पाय घसरला आणि तो ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडला. या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला.
या दुर्दैवी घटनेमुळे लिंबाळा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.





