Accident News : लातूरमध्ये कारच्या धडकेत दोघांचा मृत्यू; 4 गंभीर जखमी
Accident News : लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील टाका पाटीजवळ कार, दुचाकी आणि टेम्पो यांच्यात तिहेरी भीषण अपघात घडला आहे.

Accident News : लातूर जिल्ह्यातील टाका पाटीजवळ कार, दुचाकी आणि टेम्पो यांच्यात भीषण अपघात झाला. तुळजापूरहून औसाकडे जात असताना भरधाव कारने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून तीन ते चार जण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. (Accident News)
या अपघातात दुचाकीवरील तायप्पा दिगंबर बंडगर आणि ओंकार गोपाळ बंडगर या दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर तीन ते चार जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर दोन्ही गाड्या रस्त्याच्या कडेला पडल्या. चारचाकी कारचा पुढील भाग भुगा झाला. (Accident News)
त्यावरुन, अपघाताच्या तीव्रतेचा अंदाज बांधता येऊ शकतो. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर, जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. (Accident News)
या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून रस्ते अपघाताची समस्या गंभीर होत असल्याचीही चर्चा नागरिकांमध्ये होत आहे. (Accident News)
Accident News : दोन दुचाकींची समोरासमोर धडक; दोघांचा मृत्यू, मुलाच्या डोळ्यांसमोर वडिलांचा मृत्यू

