Latur Municipal Corporation। राज्यातील 29 महापालिका निवडणुकांचे निकाल हाती आता हळूहळू समोर येत आहेत. त्यात अनेक ठिकाणी भाजप आणि शिवसेना युती यांच्यात कांटे कि टक्कर पाहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आघाडी घेतल्याचे चित्र आहे. मात्र या सगळ्यात मोठी बातमी समोर आली आहे. लातूरमध्ये काँग्रेसने जोरदार मुंसडी घेतल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. लातूर महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने बहुमताचा आकडा गाठला आहे. काँग्रेस आणि वंचितच्या युतीला लातूर पालिकेत 37 जागा मिळाल्या आहेत. तर भाजपला 14 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळं लातूर महानगरपालिकेत काँग्रेसचा महापौर होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. लातूर महानगरपालिका निवडणूक निकाल जाहीर होत आहे. लातूर शहर महानगरपालिकेच्या 70 जाागांसाठी गुरुवारी 15 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. सरासरी 60 टक्के मतदान झाले होते. लातूर महानगरपालिकेत काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात मुख्य लढत झाली होती. या पालिकेत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात युती होती. एकूण सर्व पक्षांचे मिळून 369 उमेदवार रिंगणात होते. एकूण 70 जागांपैकी विजयासाठी 36 जागांची आवश्यकता आहे. 36 हा बहुमताचा आकडा आहे. Latur Municipal Corporation। लातूर महानगरपालिका निवडणुकीत एकूण 70 जागांसाठी 369 उमेदवार रिंगणात आहेत. पालिकेवर सत्ता काबिज करण्यासाठी 36 जागांची आवश्यकता आहे. या निवडणुकीत काँग्रेस 65, वंचित बहुजन आघााडी 5 जागा लढवत आहे. या दोन्ही पक्षांची युती आहे. त्याचबरोबर भाजप 70 जागा लढवत आहे. तर राष्ट्रवादी अजित पवार गट 60 जागांवर निवडणूक लढवत आहे. कोणत्या पक्षाला किती जागा? Latur Municipal Corporation। एकूण प्रभाग 18 – जागा 70 भाजपा – 14 काँग्रेस – 32 वंचित मबहुजन आघाडी – 05 राष्ट्रवादी अजित पवार गट – राष्ट्रवादी शरद पवार गट – शिवसेना शिंदे – शिवसेना ठाकरे – MIM –