लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर

मुंबई – ब्रीच कॅन्डी रुग्णालयातील आयसीयूमध्ये दाखल असलेल्या प्रख्यात गायिका लता मंगेशकर यांची प्रकृती आता स्थिर आहे अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांच्या प्रवक्त्याने अधिकृतपणे दिली आहे.
92 वर्षीय लता मंगेशकर यांना करोनाची बाधा झाल्यामुळे 9 जानेवारी रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
, त्यानंतर त्यांच्या प्रकृतीविषयी कोणतीही अधिकृत माहिती दिली गेली नव्हती. तथापि, आज मंगेशकर कुटुंबाच्या प्रवक्त्या अनुषा श्रीनिवास अय्यर यांनी सांगितले की लतादीदीची तब्येत आता स्थिर असून त्या डॉक्टरांनी अनुमती दिल्यानंतर लवकरच घरी परत येतील.
दोन दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याचे सांगितले गेले होते पण ती चुकीची बातमी होती असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. लतादीदींच्या प्रकृतीविषयी प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या डिस्टर्बिंग आहेत, पण त्या आता स्थिर आहेत, आता त्यांना केवळ डॉक्टरांच्या देखरेखीखाली आयसीयूमध्येच ठेवण्यात आले आहे, त्या आता लवकर घरी येतील यासाठी प्रार्थना करा, असे अय्यर यांनी म्हटले आहे.





