Lata Mangeshkar: आदित्य ठाकरेंकडून शिवाजी पार्कवरील तयारीचा आढावा

मुंबई : गेल्या अनेक दशकांपासून अधिक काळ जगभरातील अगणित संगीतप्रेमींचं भावविश्व समृद्ध करणारा अजरामर असा स्वर आज हरपला आहे.भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. लता दीदींच्या जाण्याने आज संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. गेल्या २८ दिवसांपासून मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क मैदानातच अंत्यसंस्कार होणार आहेत. सर्वसामान्यांनाही लता दीदींचे अंत्यदर्शन घेता येणार आहे. यासाठी शिवाजी पार्कच्या जीमखान गेट येथून नागरिकांना प्रवेश देण्यात येणार. पंतप्रधान मोदींसह व्हीआयपी व्यक्ती अंत्यदर्शनाला उपस्थित राहणार असल्याने सारे अंत्यविधी शिवाजी पार्कमध्येच होणार आहेत.
शिवाजी पार्क मैदानात लतादीदींचे अंत्यसंस्कार होणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी शिवाजी पार्कवरील तयारीचा आढावा घेतला आहे. आदित्य ठाकरेंनी संबंधित अधिकाऱ्यांकडून संपूर्ण माहिती जाणून घेतली.





