Devendra Fadnavis : राज्याचे लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत नाट्यमय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज मागे घेण्याबाबत हालचाली सुरू असून, पक्षाचे नेते विजय वड्डेटीवार यांनी काँग्रेस निवडणुकीतून माघार घेऊ शकते, असे संकेत दिले आहेत. यासंदर्भात पक्षाचा निर्णय हायकमांडला कळवण्यात आला असून अंतिम आदेशानंतर पुढील प्रक्रिया होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी तिसऱ्यांदा फोनवरून संपर्क साधत पाठिंब्याची विनंती केल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सपकाळ यांच्याशी संवाद साधल्याचे समजते. Devendra Fadnavis Devendra Fadnavis : शेवटचे काही तास बाकी, राजकीय हालचालींना वेग देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी मोठ्या भावाप्रमाणे उभे राहण्याचा शब्द दिला होता. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी बारामतीत निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी स्वतः पुढाकार घेत काँग्रेसला उमेदवार माघारी घेण्याची विनंती केल्याची चर्चा आहे. Devendra Fadnavis या मतदारसंघातून काँग्रेसने ॲड. आकाश मोरे यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, सर्वच पक्षांची निवडणूक बिनविरोध व्हावी अशी भूमिका असताना काँग्रेसने लोकशाहीचा विचार करत उमेदवार मैदानात उतरवला आहे. दरम्यान, भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे, शरद पवार यांची राष्ट्रवादी पक्षांनी सुनेत्रा पवार यांना पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र, काँग्रेसने उमेदवार दिल्यामुळे बिनविरोध निवडीमध्ये अडथळा निर्माण झाला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीस काही तास शिल्लक असताना काँग्रेस काय निर्णय घेते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. हेही वाचा : Congress on Baramati Election: “बारामती पोटनिवडणूकीतून काँग्रेस माघार घेणार, निर्णय दिल्ली हायकमांडला कळवणार”