स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला कोयना धरणावर “लेझर शो’
Updated On:

कोयनानगर – कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने पूर्णतः उघडीप दिली आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाची जागा कडक ऊनाने घेतली आहे. कोयना धरणात सध्या ९० टीएमसी पाणीसाठा आहे. धरणातील जलपातळी स्थिर झाली आहे. पाणलोट क्षेत्रातील नवजा येथे पावसाने ५ हजार मिलिमीटर टप्पा ओलांडला आहे. १५ ऑगस्ट असल्याने धरणावर लेझर शोच्या माध्यामातून देशप्रेम व्यक्त करण्यासाठी धरण व्यवस्थापनाने धरणाचे ६ वक्र दरवाजे अर्ध्या फुटावर उघडून धरणातून नदीपात्रात १,१०० क्युसेक पाणी सोडण्यात आले.





