सॅन्टियागो (चिली) – चिलीच्या उत्तरेकडील भागात शनिवारी लास्कर नावाचा ज्वालामुखीचा उद्रेक झाला. या ज्वालामुखीमुळे या परिसराला भूकंपासारखे हादरे बसले आणि ज्वालामुखीच्या तोंडातून वाफा आणि धुराचे लोट बाहेर पडायला लागले. ज्वालामुखीच्या मुखातून बाहेर पडणारी राख आणि लाव्हा हवेत 6 हजार फुटांपर्यंत फेकला जाऊ लागला होता. मध्यरात्रीच्या सुमारास या ज्वालामुखीचा उद्रेक झाला.
ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे येथून 30 किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या गावाला सुरक्षिततेचा इशारा देण्यात आला आहे. आवश्यकता वाटल्यास या भागातील रहिवासांना सुरक्षिततेसाठी दुसरीकडे स्थलांतर करण्याची सूचना देण्यात आली आहे.
#RussiaUkraineWar : रशियाच्या ताब्यातील मेलिटोपोल शहरावर युक्रेनचा ‘रॉकेट लॉंचर’चा मारा
ज्वाला आणि भूगर्भातील वायूंमुळे आतापर्यंत कोणतेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही. ज्वालामुखीचा उद्रेक झालेले ठिकाण समुद्रसपाटीपासून साडे 5 हजार मीटर उंचीवर असून सॅन पेड्रो डी अटॅकामा या लोकप्रिय पर्यटन स्थळापासून 70 किलोमीटर अंतरावर आहे.