Corona Vaccine : मुंबईत लसींचा मोठा तुटवडा
Updated On:

मुंबई – मुंबईत लसींचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे शहरातील 249 केंद्रांवरील लसीकरण आज मंगळवारी बंद ठेवावे लागले आहे. शहरात 309 ठिकाणी लस देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
पण आज मंगळवारी यातील केवळ 58 केंद्रेच सुरू ठेवण्यात आली आहेत. लस पुरवठा सुरळीत झाल्यानंतर ही केंद्रे पुन्हा सुरू केली जातील अशी माहिती संबंधीत अधिकाऱ्यांनी दिली. मुंबई महापालिकेच्यावतीने काल जारी करण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शहरातील 14 लाख 96 हजार 498 नागरीकांना आत्तापर्यंत करोना लसींचे दोन्हीं डोस देण्यात आले आहेत.
सरकारकडून मोफत लस पुरवली जात आहे, पण त्याचा पुरवठा अगदीच अल्प असल्याने अनेक नागरीकांना त्यासाठी सध्या तिष्ठत राहावे लागत आहे. खासगी रूग्णालयांमध्ये मात्र विकतची लस बऱ्यापैकी उपलब्ध आहे.





