गुजरातमधून पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात ड्रग्स् जप्त; तब्बल इतक्या कोटींचे….
Updated On:

Gujarat – अंमली पदार्थ तस्करांविरोधात गुजरात पोलिसांची आणखी एक मोठी कारवाई यशस्वी झाली आहे. अरबी समुद्रातील पोरबंदर येथे संयुक्त कारवाई तब्बल 480 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहे. ही कारवाई एटीएस, गुजरात पोलीस, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आणि तटरक्षक दलाने संयुक्तपणे केली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 मार्चच्या रात्री एका गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या संयुक्त कारवाईत समुद्रात एक पाकिस्तानी बोट पकडण्यात आली होती. या बोटीतून सुमारे 480 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले होते.
या ऑपरेशनमध्ये आयसीजी जहाज आणि डॉर्नियरची मदत घेण्यात आली. पोरबंदरपासून सुमारे 350 किलोमीटर अंतरावर अरबी समुद्रात संशयास्पदरीत्या फिरत असताना ही बोट पकडली. या कारवाईत जहाजेवरील सहा कर्मचाऱ्यांनाही ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.





