Wayanad Landslide : वायनाला मुसळधार पावसामुळे भूस्खलन; कल्लाडी बोगदा प्रकल्प परिसरात दुर्घटना
केरळच्या वायनाड जिल्ह्यात मंगळवारी मुसळधार पावसात कल्लाडी परिसरात मोठे भूस्खलन झाले. ही घटना मीनाक्षी पुलाजवळील अनाक्कम्पोयिल-कल्लाडी-मेप्पडी दुहेरी बोगदा रस्ता प्रकल्पाच्या ठिकाणी घडली.

Wayanad Landslide – केरळच्या वायनाड जिल्ह्यात मंगळवारी मुसळधार पावसात कल्लाडी परिसरात मोठे भूस्खलन झाले. ही घटना मीनाक्षी पुलाजवळील अनाक्कम्पोयिल-कल्लाडी-मेप्पडी दुहेरी बोगदा रस्ता प्रकल्पाच्या ठिकाणी घडली. तिथे बांधकाम आधीपासूनच सुरू होते.
प्राथमिक अहवालानुसार, मुसळधार पावसामुळे बोगद्याच्या बांधकाम स्थळावरून मोठ्या प्रमाणात ढिगारा आणि दगड कोसळले, ज्यात पाच जण जखमी झाले.
काॅंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वड्रा यांचा हा मतदारसंघ असून त्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. दुर्धटनेतील जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
आतापर्यंत कोणाचाही मृत्यू झालेला नाही. भूस्खलनाने बाधित झालेला परिसर मुंडकाईजवळ आहे, जिथे २०२४ मध्येही मोठ्या भूस्खलनाने विध्वंस घडवला होता.
केरळ राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माहितीनुसार, वायनाड जिल्ह्यात गेल्या २४ तासांत अंदाजे २६५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे बोगदा प्रकल्पाच्या जागेवरील बांधकाम आधीच थांबवण्यात आले होते.
असे असूनही, मंगळवारी डोंगरावरून अचानक ढिगारा आणि मोठे दगड पडू लागले, ज्यामुळे प्रकल्पस्थळाजवळील लोकांना त्रास झाला. या घटनेनंतर, स्थानिक प्रशासनाने तात्काळ बचाव आणि मदतकार्य सुरू केले.





