लालू यादव यांना किडनी दान करणार त्यांची लेक रोहिणी, नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात RJD सुप्रिमो जाऊ शकतात सिंगापूरला
Updated On:

नवी दिल्ली – राजद सुप्रीमो आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव गेल्या अनेक वर्षांपासून किडनीसह अनेक आजारांनी त्रस्त आहेत. सिंगापूरमध्ये राहणारी त्यांची मुलगी रोहिणी आचार्य आता त्यांना किडनी दान करणार आहे. रिपोर्ट्सनुसार, गेल्या महिन्यात सिंगापूरला गेलेल्या लालू यादव यांना डॉक्टरांनी किडनी ट्रान्सप्लांट करण्याचा सल्ला दिला होता, त्यानंतर त्यांनी वडिलांना किडनी दान करणार असल्याचे म्हटले होते.
आरजेडी प्रमुख लालू यादव सुरुवातीला रोहिणीची किडनी दान करण्याच्या बाजूने नव्हते, पण नंतर रोहिणी आणि इतर कुटुंबीयांच्या दबावानंतर लालू यादव यांनी होकार दिल्याचेही कळते.





