लालू प्रसाद यादव यांच्या लेकीची नितीश कुमारांवर जहरी टीका,’कचरा पुन्हा कचराकुंडीत..’

Bihar Political Crisis : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज एक मोठे पाऊल उचलत आपल्या पदाचा राजीनामा दिला. जेडीयू विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर त्यांनी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भेट घेऊन आपल्या मुख्यामंत्रीपदाचा राजीनामा सादर केला. त्यामुळे बिहारमध्ये आरजेडी, जेडीयू, काँग्रेस आणि डाव्यांची युती तुटली. आता नितीशकुमार भाजपच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करण्याचा दावा करणार आहेत.
कूड़ा गया फिर से कूड़ेदानी में
कूड़ा – मंडली को बदबूदार कूड़ा मुबारक pic.twitter.com/gQvablD7fC— Rohini Acharya (@RohiniAcharya2) January 28, 2024
अशात आता पर्यंत आरजेडीकडून तेजस्वी यादव तसेच लालू प्रसाद यादव यांनी अद्याप नितीश कुमार यांच्यावर बोचरी टीका केली नाही मात्र. लालू प्रसाद यादव यांच्या कन्या रोहिणी आचार्य या नेहमीच नितीश कुमारांवर टीका करत असतात. आताही त्यांनी एक्स अकाऊंटवर ट्विट करत त्यांच्यावर टोला लगावला आहे.
रोहित आचार्यने ट्विट केले आहे की,’कचरा पुन्हा कचरापेटीतमध्ये जातोय कचरा – गटाला दुर्गंधीयुक्त कचरा लखला’ या मजकुरासह रोहिणी आचार्य यांनी कचराकुंडीत करचा टाकतानाचा एक फोटोही जोडला आहे. असेही म्हणत त्यांनी जहरी टीका केली आहे.
नव्या सरकारमध्ये नितीश कुमार मुख्यमंत्री राहतील. त्यांच्यासोबत भाजपचे दोन नेते उपमुख्यमंत्री होणार आहेत. उपमुख्यमंत्री कोण होणार याबाबत सस्पेंस कायम आहे. मात्र, सुशील मोदी आणि रेणू देवी उपमुख्यमंत्री होऊ शकतात, असे सांगण्यात येत आहे.
नितीश कुमार आज दुपारी 4 वाजता नव्या सरकारमध्ये मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नितीश कुमार मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची ही 9वी वेळ असेल. 6 ते 8 नेते मंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली. जीतन राम मांझी यांच्या हम या पक्षाचाही नव्या सरकारमध्ये समावेश होणार आहे. मांझी आपले समर्थन पत्र नितीश कुमार यांना सादर करणार आहेत.
लोकसभा निवडणुकीपूर्वी नितीश कुमार यांचे हे पाऊल भारतातील विरोधी पक्षांच्या आघाडीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. वास्तविक नितीश कुमार हे इंडिया आघाडीचे शिल्पकार मानले जातात. शुक्रवारीच जेडीयूशी संबंधित सूत्रांनी सांगितले होते की, नितीश कुमार यांना इंडिया आघाडीचे संयोजक न बनवल्यामुळे आणि जागा वाटपाच्या विलंबामुळे ते नाराज होते.
नितीश कुमार यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने लालू यादव यांच्या पक्ष राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) च्या अनेक आमदारांनी सरकार स्थापनेसाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे सांगितले. राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी 122 आमदारांची गरज आहे. आरजेडीकडे 115 आमदार आहेत.




