Lalu Prasad Yadav। बिहारची राजधानी पाटणा याठिकाणी गुन्हेगार कोणत्याही भीतीशिवाय गुन्हे करत आहेत. गेल्या २४ तासांत याठिकाणी चार खुनाच्या घटना घडल्या आहेत. पहिली घटना सोमवारी पटनाच्या आलमगंज पोलीस ठाण्याच्या परिसरात घडली, जिथे एका महिलेची आणि तिच्या मुलीची गोळ्या घालून हत्या करण्यात आली, तर दुसरी घटना आज पटना लगतच्या बिक्रम पोलीस ठाण्याच्या परिसरातील मजौली सिंघारा रस्त्यावर घडली, जिथे दिवसाढवळ्या टवाळखोरांनी दुचाकीवरून जाणाऱ्या दोन तरुणांची गोळ्या घालून हत्या केली. या गुन्हेगारी घटनांनंतर बिहारचे राजकारण आता तापले आहे. राजद प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी नितीश कुमार आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवला. त्यांनीसोशल मीडियावर लिहिले की नितीश यांनी सांगावे की संध्याकाळी ५ वाजण्यापूर्वी घरात घुसून किती खून होत आहेत? नितीश यांना माहिती आहे का आणि समजते का की अधिकृत आकडेवारीनुसार त्यांच्या कारकिर्दीत ६५,००० खून झाले आहेत? एवढेच नाही तर लालू म्हणाले की, नितीश-भाजपने केवळ कायदा आणि सुव्यवस्थाच नष्ट केली नाही तर ती जाळून टाकली आहे. बिहारमध्ये इतके भ्रष्ट, निष्काळजी आणि आळशी पोलिस कधीच नव्हते.” असे म्हणत त्यांच्यावर सडकून टीका केली आहे. जेडीयूने प्रत्युत्तर दिले Lalu Prasad Yadav। आरोप-प्रत्यारोपांचा हा सिलसिला इथेच थांबला नाही. जेडीयू नेते अभिषेक झा म्हणाले की, लालू यादव आणि राजद नितीश कुमार यांची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत. नितीश यांनी बिहारमध्ये कायद्याचे राज्य स्थापित केले आहे, लालू यादव यांना गुन्ह्यावर बोलण्याचा अधिकार नाही. या लोकांनी बिहारमध्ये जंगलराज स्थापन केले होते.” असे ,म्हणत लालूंवर पलटवार केला. नितीश यांना क्षणभरही सत्तेत राहण्याचा अधिकार नाही Lalu Prasad Yadav। दुसरीकडे, राजद नेते मृत्युंजय तिवारी म्हणाले की, “बिहारमध्ये गुन्हेगारांचा वावर आहे, नितीश सरकार हे एक निरुपयोगी डबल इंजिन सरकार आहे. येथे गुन्हेगारी राजवट स्थापित झाली आहे. लोकांना त्यांच्या घरात गोळ्या घातल्या जात आहेत. या सरकारने कायदा आणि सुव्यवस्थेचा नाश केला आहे. नितीशकुमार यांना एक मिनिटही सत्तेत राहण्याचा अधिकार नाही.” असेही त्यांनी यावेळी म्हटले.