Lalit Patil case: ससूनचे डीन डॉ. ठाकूर यांना तत्काळ अटक करा – आमदार रवींद्र धंगेकर यांची मागणी

Updated On:

पुणे – ड्रग माफिया ललित पाटील हा ससून रुग्णालयातून ड्रग रॅकेट चालवत होता, हे स्पष्ट झाले आहे. त्याच्यावर रुग्णालयाचे डीन डॉ. संजीव ठाकूर हेच उपचार करत असल्याचे रजिस्टरमधील माहितीवरून निष्पन्न झाले आहे. त्यामुळे चुकीचे काम केले असताना डॉ. ठाकूर यांना निलंबीत करण्याचे सोडून राज्य शासन त्यांना पाठीशी घालत आहे, ही बाब दुर्देवी आहे. ठाकूर यांना हवाला मार्फत लाखो रूपये घेतले आहेत, असा आम्हाला संशय आहे. डॉ. ठाकूर यांना पदावरून हटवण्यात यावे. त्यांना अटक करुन त्यांची नॉर्को टेस्ट केली जावी, अशी मागणी कॉग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी पत्रकार परिषदेत केली.

धंगेकर म्हणाले, “ससूनच्या निमित्ताने गुन्हेगारी षडयंत्र उघड झाले आहे. गुन्हेगारी क्षेत्राशी संबधित लोकांना एकत्रीत करून सत्तेत आलेले सध्याचे हे सरकार आहे.” ललित पाटील प्रकरणामुळे राज्य सरकारची नाचक्की झाली आहे. त्यामुळे ललित पाटीलचा एनकाउंटर करून तपास थांबविण्याचा देखील प्रयत्न होईल, अशीही शक्यता ही धंगेकर यांनी यावेळी वर्तवली.

सरकारला केवळ याबाबत राजकारण करायचे आहे. ड्रग्जच्या आहारी तरूणाई चालली असताना सरकारचे शहरातील तरूणाईकडे लक्ष नाही. हे सरकार आणि प्रशासन ललित पाटीलच्या पैशाखाली दबले गेले आहे. ललित पाटीलसारख्या गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचे काम सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. त्याच बरोबर राष्ट्रीय तपास यंत्रणांमार्फत या प्रकरणाचा तपास करण्याची मागणीही धंगेकर यांनी केली.

हा ‘उद्योग’ पोलिसांच्या मेहरबानीने सुरू होते. संजीव ठाकूर यांना मंत्रीमंडळातील एका मंत्र्याचा वरदहस्त आहे. ठाकूर यांना सहआरोपी करून पहिल्या दिवशी अटक होण्याची गरज होती. ठाकूर आणि ललित पाटील यांची नार्कोटेस्ट केली पाहिजे. ज्या प्रमाणे ललित सर्वत्र फिरला त्यानुसार तो आजारी वाटत नव्हता. पळून गेल्यानंतर ललितचा शोध घेत असताना आदल्या दिवशी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात ललित सापडणार अन दुसर्‍या दिवशी लगेच सापडतो. याचाच अर्थ त्याला पळून लावण्यास अधिकारीही सहभागी असल्याचे स्पष्ट होत असल्याचा आरोप धंगेकर यांनी केला.

आणखी संबंधित बातम्या

Pune : नालेसफाईची कामे हाती घ्यावीत; माजी आमदार रवींद्र धंगेकर यांची मागणी

2025-05-22 05:56:10

Pune : नालेसफाईची कामे हाती घ्यावीत; माजी आमदार रवींद्र धंगेकर यांची मागणी

रिक्षाचालकांचे प्रश्न प्राधान्याने मांडणार; आमदार रवींद्र धंगेकरांनी घेतली डाॅ. बाबा आढाव यांची भेट

2024-11-17 08:54:13

रिक्षाचालकांचे प्रश्न प्राधान्याने मांडणार; आमदार रवींद्र धंगेकरांनी घेतली डाॅ. बाबा आढाव यांची भेट

Kasba Assembly Election 2024 | विधानसभेत पुणेकरांचा आवाज बुलंद करण्याचे काम मी केलं - आमदार रवींद्र धंगेकर

2024-11-10 21:13:40

Kasba Assembly Election 2024 | विधानसभेत पुणेकरांचा आवाज बुलंद करण्याचे काम मी केलं - आमदार रवींद्र धंगेकर

पुणे | कसब्यातून धंगेकर, व्यवहारेंसह दहा जणांचे अर्ज

2024-10-29 04:35:53

पुणे | कसब्यातून धंगेकर, व्यवहारेंसह दहा जणांचे अर्ज

पुणे | महिला सुरक्षेबाबत राज्यशासन उदासीन - खासदार सुळे

2024-10-09 04:09:27

पुणे | महिला सुरक्षेबाबत राज्यशासन उदासीन - खासदार सुळे