#LaLiga Football : ‘ओसासुना’ संघावर मात करत ‘रियल माद्रिद’ अव्वलस्थानी

माद्रिद : रियल माद्रिद संघाने ‘ला लीगा’ फुटबाॅल स्पर्धेतील सामन्यात ओसासुना संघाचा ४-१ ने पराभव करत विजय नोंदविला. या विजयासह रिअल माद्रिदचा संघ गुणतालिकेत अव्वलस्थानी पोहचला आहे.
💜💜 Party at El Sadar for @realmadriden! 💜💜#OsasunaRealMadrid 1-4 pic.twitter.com/X7VLptGXvC
— LALIGA English (@LaLigaEN) February 9, 2020
रियल माद्रिद संघाकडून इस्कोने ३३ व्या मिनिटाला, सर्जियो रोमासने ३८ व्या मिनिटाला, लुकास वाजक्वेजने ८४ व्या मिनिटाला तर लुका जुविकने (९०+२) मिनिटाला गोल केला. ओसासुनाकडून उनाई गार्सियाने १४ व्या मिनिटाला एकमेव गोल केला.
✅ Matchday 23!
🤔 Where is your team in #LaLigaSantander Standings now? pic.twitter.com/CoNMlVJ5uV
— LALIGA English (@LaLigaEN) February 9, 2020
या विजयासह रियल माद्रिद संघाचे २३ सामन्यात ५२ गुण झाले असून ते गुणतालिकेत अव्वलस्थानी पोहचले आहेत. तर, बार्सिलोनाचा संघ ४९ गुणासह दुस-या स्थानी आहे. पराभूत ओसासुनाचा संघ २८ गुणासह १२ व्या स्थानी आहे.




