#LaLiga Football : ‘बार्सिलोना’ संघाचा ‘आइबीआ’वर विजय

पुणे : स्पॅनिश लीग ‘ला लीगा’ फुटबाॅल स्पर्धेत बुधवारी बार्सिलोना संघाने आइबीआ संघाचा २-१ असा पराभव करत विजय साकारला. या विजयासह बार्सिलोनाचा संघ गुणतालिकेत अव्वलस्थानी कायम आहे.
🎥 HIGHLIGHTS 🎥
COPA DEL REY | Ibiza 1 – 2 Barça
1. Goal @AntoGriezmann, assist @DeJongFrenkie21
2. Goal @AntoGriezmann, assist @JordiAlba pic.twitter.com/cWpWa5Uir8— FC Barcelona (@FCBarcelona) January 23, 2020
सामन्यात बार्सिलोना संघाकडून ग्रिजमैनने ७२ व्या मिनिटाला पहिला आणि (९०+४) अतिरिक्त वेळेत दुसरा गोल करत संघाच्या विजयात महत्वपूर्ण कामगिरी बजावली. तर, आइबीआ संघाकडून जोसेप काबाली मार्टिनने ९ व्या मिनिटाला एकमेव गोल केला.
‘ला लीगा’ स्पर्धेत गुणतालिकेत बार्सिलेनाचा संघ ४३ गुणासह अव्वलस्थानी आहे. बार्सिलोनाने २० सामन्यापैकी १३ सामन्यात विजय मिळवला आहे. ३ सामन्यात पराभव तर ४ सामने अनिर्णित राहिले आहेत.




