Subhedar Teaser : लाला हमसे ना भिडियो! अनिल कपूर पुन्हा अॅक्शन अवतारात; सुभेदाराचा दमदार टीझर आऊट
Subhedar Teaser : ज्येष्ठ अभिनेते अनिल कपूर पुन्हा एकदा त्यांच्या अॅक्शन अवतारामध्ये परतले असून, सुभेदार या आगामी चित्रपटात दमदार भूमिकेत दिसणार आहेत.
Subhedar Teaser : ९० च्या दशकात आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अभिनेते म्हणजे अनिल कपूर. त्यांच्या आजवरच्या चित्रपटसृष्टीवर नजर टाकल्यास त्यांचा ओरा काय लेव्हलचा आहे लक्षात येते. हा ओरा कायम टिकून ठेवण्याचे काम सगळ्याच कलाकारांना जमत नाही. पण अनिल कपूर याला अपवाद आहेत.
आत्ताच्या घडीच्या चित्रपटातील त्यांचा अभिनय तरुणच वाटतो. नायक चित्रपटातील त्यांचा अॅक्शन अवतार प्रेक्षकांवर छाप पाडून गेला. आता पुन्हा एकदा अनिल कपूर यांनी त्यांच्या अॅक्शन अवतारात कमबॅक केले आहे.
View this post on Instagram
त्यांचा आगमी सुभेदार चित्रपटाचा दमदार टीझर प्रदर्शित झाला आहे. या टीझरमध्ये अनिल कपूर पुन्हा एकदा त्यांच्या अॅक्शन अवतारात परतले आहेत. निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली आहे. सुभेदार चित्रपटाचा टीझर अनिल कपूर आणि फैसल मलिक यांच्या एका दृश्याने सुरू होतो. टीझरमध्ये अनिल कपूर यांना राग येतो, परंतु त्यावर नियंत्रण मिळवण्याचे काम त्यांनी केले आहे.
मात्र, त्यांचा राग शेवटी अनावर होतो आणि अॅक्शन मोडमध्ये जातो. अनिल कपूरच्या आवाजात बुंदेलखंडी संवाद देखील आहे, “लाला हमसे ना भिडियो,” ज्याचा अर्थ आहे, “बेटा, माझ्याशी भांडू नकोस.” हा डायलॅागच चित्रपटाचा मुख्य गाभा असल्याचे दर्शवतो. गेल्या अनेक दिवसांपासून सुभेदार चित्रपटाची बरीच चर्चा होती. याबाबत कोणतीही माहिती समोर न येता थेट चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.
५ मार्च या दिवशी अभिनेते अनिल कपूर यांची मुख्य भूमिका असलेला सुभेदार प्राइम व्हिडिओ या ओटीटीवर रिलीज होणार आहे. चित्रपटात अनिल कपूर यांच्यासह राधिका मदान, सौरभ शुक्ला, आदित्य रावल, फैसल मलिक, मोना सिंह यांच्या देखील विशेष भूमिका आहेत. सुरेश त्रिवेणी यांनी सुभेदार चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून, विक्रम मल्होत्रा, अनिल कपूर आणि सुरेश त्रिवेणी निर्माते आहेत. चित्रपटाच्या कथेबद्दल अद्याप जास्त माहिती समोर आलेली नसली तरी चाहते अनिल कपूर यांच्या अॅक्शन अवताराची आतुरतेने वाट पाहत आहेत.
हेही वाचा : Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ ; वाचा आजचा भाव काय ?






