Lal Krishna Advani : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी रुग्णालयात दाखल
Lal Krishna Advani: पंतप्रधान मोदींनी आठवड्याभरापूर्वीच घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट

Lal Krishna Advani : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना छातीच्या संसर्गाचा त्रास झाल्याने दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 98 वर्षीय अडवाणी यांना यांना शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास दवाखान्यात आणण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर फुफ्फुस विभागात उपचार सुरु आहेत.
अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 7 ऑक्टोबर रोजी नवी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान, सरकार प्रमुख म्हणून 25 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मोदींनी अडवाणींचे आशीर्वाद घेतले. पंतप्रधान मोदी यांनी 2001 मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून सरकारची सूत्रे स्वीकारली. त्यानंतर त्यांनी तीन वेळा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले. पुढे ते पंतप्रधान झाले आणि सलग तीन लोकसभा निवडणुक जिंकली.
माजी उपपंतप्रधान अडवाणी यांच्या भेटीनंतर पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली होती. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले की, अनेक दशके सार्वजनिक सेवा आणि राष्ट्रीय जीवनात योगदान देऊन त्यांनी आपला अमिट ठसा उमटवला आहे. भारताची प्रगती साधण्यात आणि देशाला बळकट करण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
भाजपचे तीन वेळा राहिले राष्ट्रीय अध्यक्ष
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून तीन वेळा काम पाहिले. त्यांचा पहिला कार्यकाळ 1986 ते 1990 दुसरा 1993 ते 1998 आणि तिसरा 2004 ते 2005 असा होता. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचा मतदारवर्ग झपाट्याने विस्तारला. अडवाणी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमध्ये 1998 ते 2004 पर्यंत केंद्रीय गृहमंत्री आणि 2002 ते 2004 पर्यंत उपपंतप्रधान म्हणून काम पाहिले. त्यांनी लोकसभेत विरोधी पक्षनेते म्हणूनही काम पाहिले.
भारतरत्न पुरस्काराने सन्मानित
भाजपाच्या यशामध्ये लालकृष्ण अडवाणींचा मोलाचा वाटा राहिला आहे. राम मंदिराच्या उभारणीसाठी अडवाणी यांनी मोलाचे योगदान दिले होते. गेल्या अनेक वर्षांपासून लालकृष्ण अडवाणी हे राजकारणापासून अलिप्त आहेत. २२ जानेवारी २०२४ मध्ये अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. २०२४ मध्ये लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
हेही वाचा:





