Bhamburdekar Jewellers : नवरात्रोत्सवानिमित्त सराफ बाजारात तेजी, भांबुर्डेकर ज्वेलर्समध्ये ग्राहकांची गर्दी
Bhamburdekar Jewellers : नवरात्रोत्सवामुळे सराफ बाजारात चैतन्य निर्माण

पिंपरी – नवरात्रोत्सव आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत सणासुदीची लगबग सुरू झाली आहे. या काळात सोने खरेदीला विशेष महत्त्व असते. सणासुदीच्या खरेदीसाठी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी भोसरी येथील भांबुर्डेकर ज्वेलर्सकडून विशेष ऑफर्स उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांना आपल्या आवडीचे दागिने खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.
सणासुदीच्या काळात सोने खरेदी करणे ही अनेक कुटुंबांची परंपरा आहे. नवरात्रोत्सव, दसरा आणि दिवाळीच्या निमित्ताने सोन्याचे दागिने खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल असतो. दागिन्यांच्या विविध प्रकारांसोबतच ग्राहकांना परवडणार्या दरात खरेदी करता यावी, यासाठी भांबुर्डेकर ज्वेलर्सकडून दागिन्यांच्या मजुरीवर ग्राहकांच्या पसंतीनुसार सवलत दिली जात आहे. या विशेष ऑफरमुळे सणासुदीच्या खरेदीला अधिक आकर्षक स्वरूप मिळाले आहे.
सणासुदीच्या खरेदीसोबतच ग्राहकांना आकर्षक दागिने निवडण्याची संधी मिळावी, हा या ऑफरमागील उद्देश आहे. पारंपरिक दागिन्यांपासून आधुनिक डिझाइनपर्यंत आपल्या आवडीनुसार दागिने निवडताना ग्राहकांना मजुरीवरील सवलतीचा लाभ घेता येणार आहे.सणासुदीच्या निमित्ताने सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करणार्या ग्राहकांनी भोसरी येथील भांबुर्डेकर ज्वेलर्सला भेट देऊन या विशेष ऑफर्सची माहिती घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
मात्र, सोन्या-चांदीच्या दरांतील चढ-उतारांचा खरेदीवर परिणाम होत असल्याने ग्राहक खरेदीपूर्वी दरांची माहिती घेत आहेत. एकूणच, नवरात्रोत्सवामुळे सराफ बाजारात चैतन्य निर्माण झाले असून, आगामी सणांच्या काळातही बाजारातील तेजी कायम राहण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
‘सोनं ही केवळ मौल्यवान धातूची वस्तू नसून भारतीय संस्कृतीत त्याला पवित्र स्थान आहे. सणासुदीच्या काळात सोनं खरेदी करण्याला विशेष महत्त्व असते. सध्याच्या बाजारभावांच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांमध्ये सोने खरेदीचा उत्साह दिसून येत आहे. सोन्याकडे अनेक जण दीर्घकालीन गुंतवणुकीचा पर्याय म्हणूनही पाहतात. त्यामुळे ग्राहकांनी आपल्या आर्थिक क्षमतेनुसार आणि गरजेनुसार सोने खरेदीचा निर्णय घ्यावा’- भांबुर्डेकर सराफ अँड ज्वेलर्सचे संचालक विलास भांबुर्डेकर.
YCM Hospital: वायसीएमचे डॉक्टर तर्राट…? शवविच्छेदन विभागात ‘दारूचा अड्डा’ -टेबलावर मद्याच्या बाटल्या





