Delhi Ramlila: दिल्लीतील रामलीला कार्यक्रमात रावणासोबत झुरळचेही करणार दहन; राजकीय हेतू असल्याच्या आरोपांवर आयोजकांकडून स्पष्टीकरण
Delhi Ramlila : सामाजिक आरोग्याचा संदेश देण्यासाठी हा निर्णय

Delhi Ramlila : यंदाच्या विजयादशमीनिमित्त दिल्लीतील रामलीला कार्यक्रमात रावणासोबत झुरळचेही दहन केले जाणार आहे. श्री केशव रामलीला समितीने रावण, कुंभकर्ण आणि मेघनाद यांच्या पुतळ्यांसोबत 30 फूट उंच झुरळाच्या पुतळ्याचे दहन करण्याची घोषणा केली आहे. मात्र ही अनोखी परंपरा आहे की राजकीय हेतूने प्रेरीत उपक्रम असल्याचा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर आयोजकांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे.
दसऱ्याच्या पारंपरिक कार्यक्रमात सामाजिक समस्यांचे प्रतीकात्मक चित्रण करण्याचा हा प्रयत्न आहे. हा अनोखा उपक्रम कोणत्याही राजकारणाशी प्रेरित नाही. झुरळ हे आपल्या समाजात पसरलेली घाण, अस्वच्छता आणि रोगांचे प्रतीक मानले जात असल्याने सामाजिक आरोग्याचा संदेश देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
स्वच्छ भारत संदेश देण्याचा उद्देश
श्री केशव रामलीला समितीने हा निर्णय घेतला आहे. समितीचे अध्यक्ष आणि भाजपाचे आमदार अशोक गोयल यांनी ‘एएनआय’शी बोलताना झुरळाचा पुतळा जाळण्यामागे वाईटावर चांगल्याचा विजयाबरोबरच स्वच्छतेचा संदेश देण्याचा उद्देश असल्याचे सांगितले. स्वच्छ भारत आणि स्वच्छ दिल्ली मोहिमेचा भाग म्हणून हा उपक्रम राबवण्यात येत असल्याचे समितीने म्हटले आहे.
#WATCH | Delhi: The Shri Keshav Ramlila Committee is set to burn a cockroach effigy alongside Ravana on Dussehra to symbolize the fight against dirt and unhygienic conditions.
Ashok Goel Devaraha, President of the Shri Keshav Ramlila Committee and Model Town MLA, said, “…For thousands of years, we have been burning the effigies of Ravana, Meghnada, and Kumbhakarna, a tradition that conveys the message that, ultimately, truth always prevails. Keeping this in mind, we have also traditionally burned a fourth effigy representing the specific malaise affecting the nation; for instance, we have previously burned effigies representing Naxalism and terrorism. This year, our committee, the Keshav Ramlila Committee, has decided to burn an effigy of a cockroach, which serves as a symbol of filth. Our goal is to eliminate filth, whether it is within our homes, in our immediate surroundings, or in society at large. Therefore, at the Keshav Ramlila Committee grounds in Pitampura, we will be burning an effigy shaped like a cockroach…” (15.10)
— ANI (@ANI) October 15, 2026
रावणाच्या सैन्यातील असुरांच्या प्रतीकात्मक मांडणीतही झुरळाचा समावेश केला जाणार आहे. यापूर्वी समितीने नक्षलवाद आणि दहशतवादासारख्या समस्यांचे प्रतीकात्मक पुतळे जाळल्याचे गोयल यांनी सांगितले.
यंदा घरातील, परिसरातील आणि समाजातील अस्वच्छता दूर करण्याचा संदेश देण्यासाठी झुरळाचा पुतळा जाळण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विजयादशमी हा सत्याचा असत्यावर आणि चांगुलपणाचा वाईटावर विजय दर्शवणारा सण आहे. याच विचारातून समाजातील समस्यांचे प्रतीकात्मक पुतळे जाळण्याची परंपरा पुढे नेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
‘सीजेपी’ आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रम
सध्या दिल्लीमध्ये मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ‘कॉक्रोच जनता पार्टी’ने आंदोलन सुरू केले आहे. मतदार याद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणी प्रक्रियेत कथित अनियमितता झाल्याचा आरोप करत विरोधी पक्ष आणि विद्यार्थी संघटनांकडूनही आंदोलन केले जात आहे. मात्र, झुरळाचा पुतळा जाळण्याचा निर्णय या आंदोलनाशी संबंधित असल्याचे आयोजकांनी नाकारले आहे. हा उपक्रम केवळ स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी असल्याचे आयोजकांचे मत आहे.
हेही वाचा:





