Swanandi Berde : लक्ष्याची लेक स्वानंदी बेर्डे बनली बिझनेसवुमन! ‘कांतप्रिया’ ज्वेलरी ब्रँडची केली सुरुवात; पोस्ट शेअर करत म्हणाली…

Swanandi Berde : मराठी चित्रपटसृष्टीतील आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिकाराज्य करणारा अभिनेता म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे उर्फ लक्ष्या. अभिनयाचं टॅलेंट आणि विनोदाच्या जोरावर लाडक्या लक्ष्याने प्रेक्षकांची मनं जिंकली. आता वडिलांच्या पावऊलावर पाऊल टाकत त्यांचा मुलगा अभिनय बेर्डे याने सिनेमाइंडस्ट्रीत एन्ट्री केली. पण त्यांची लेक स्वानंदी बेर्डे हिने वेगळी वाट धरत बिझनेसमध्ये पाऊल टाकत आता ती बिझनेस वुमन बनली आहे.
स्वानंदीने स्वत:चा ज्वेलरी ब्रँड सुरू केला आहे. तिने तिच्या या ज्वेलरी ब्रँडचं नावही खूप खास ठेवलं आहे. कांतप्रिया असं तिच्या ज्वेलरी बँडचं नाव आहे. या नावाचं वैशिष्ट्ये असं आहे की लक्ष्मीकांत(कांत) आणि आई प्रिया यांच्या नावावरून स्वानंदीने तिच्या ज्वेलरी ब्रँडचं नाव ठेवलं आहे. याविषयी तिने तिच्या इन्स्टाअकाऊंटवरून पोस्ट शेअर करत याबाबतची माहिती दिली आहे.
View this post on Instagram
काही स्वप्न ही फक्त आपण पाहत नाही तर त्यांचा जन्मच प्रेमापासून झालेला असतो. मी आज माझं स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने पहिलं पाऊल टाकत आहे. कांतप्रिया हे माझ्यासाठी एका ब्रँडपेक्षा खूप काही आहे. माझ्या हृदयाचा हा एक तुकडा आहे. कारण याची निर्मितीच माझे वडील(कांत) आणि आई (प्रिया) यांच्या नावापासून झाली आहे. त्या दोन व्यक्ती ज्यांनी मला घडवलं, अशी भावनिक पोस्ट स्वानंदीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील शेअर केली आहे. तर तिच्या या नव्या ब्रँडसाठी चाहत्यांनी कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.





