Priya Berde : प्रिया बेर्डेंचे रंगभूमीवर कमबॅक; ‘भुल भुलैय्या’ नाटकाबाबत व्यक्त केला आनंद
Priya Berde, Bhool Bhulaiya, Sahil Desai, Parinita Pawaskar, Aarti Solanki, Amir Tadwalkar, Ashutosh Ghorpade, Vijay Suryavanshi

Priya Berde : अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी अनेक नाटक, मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. आता ‘भुल भुलैय्या’ या नाटकाद्वारे प्रिया बेर्डे रंगभूमीवर नव्या उर्जेसह पुनरागमन करणार आहेत. त्यांच्या या नव्या नाटकाबद्दल चाहत्यांना देखील मोठी उत्सुकता आहे.
‘भुल भुलैय्या’च्या माध्यमातून पुन्हा नाट्यरसिकांच्या भेटीला येण्याबाबत प्रिया बेर्डे म्हणाल्या की, “जरी बऱ्याच वर्षांनी पुन्हा नाटकात काम करीत असले तरी नाटकापासून कधीच दूर गेले नव्हते. नाटकात काम करण्याची इच्छा मनात होतीच. पुनरागमन करण्यासाठी एका चांगल्या नाटकाच्या प्रतिक्षेत होते. ‘भुल भुलैय्या’ च्या माध्यमातून पुनरागमन करताना खूप आनंद होत आहे”.
‘भुल भुलैय्या’ नाटकात मनाच्या गाभाऱ्यात दडलेलं रहस्य, अनपेक्षित वळणांनी भरलेला एक प्रवास, तसेच प्रत्येक क्षणी चकित करणारा थरारक अनुभव आहे. जिथे सत्य आणि भास यांच्यातील सीमारेषा इतकी धूसर होते की काय खरं? अन् काय खोटं? हे ओळखणंच कठीण होतं. Priya Berde
भ्रम आणि वास्तव यांच्यातील गुंतागुंतीचा असाच रंगतदार खेळ, ‘भुल भुलैय्या’ या नाटकाद्वारे लवकरच प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. या नाटकाच्या शुभारंभाचा प्रयोग रविवार १९ एप्रिलला दु. ४.०० वा. रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, येथे संपन्न होणार आहे.
‘भुल भुलैय्या’ या नाटकात प्रिया बेर्डे यांच्यासोबत साहिल देसाई, परिणिता पावसकर, आरती सोळंकी, अमीर तडवळकर, आशुतोष घोरपडे, विजय सूर्यवंशी यांच्या मुख्य भूमिका आहेत. Priya Berde
हेही वाचा:






