लक्षवेधी : नकाशांच्या रेषांमध्ये लपलेली रणनीती

आजच्या काळात युद्धजन्य परिस्थितीत नकाशांचा मोठा प्रमाणात उपयोग होत असतो. एका अर्थाने नकाशांच्या रेषांमध्येच पुढची रणनीती लपलेली असते. नकाशे म्हणजे संरक्षणाची अदृश्य शस्त्रसज्जताच होय.
कोणतेही युद्ध कारणाशिवाय होत नाही. अगदी अनादी काळापासून युद्धासाठी कारणे लागतात. जसे की रामायण काळात सीतेला रावणाने पळवून नेले, तर महाभारतात पांडवांना राज्य न देण्यावरून युद्ध झाले व त्या युद्धात प्रसिद्ध असा ऋौंच व्यूहरचना पाहायला मिळाली ती फक्त विजय मिळवण्यासाठीची व्यूहरचना होती. तिथेच आजच्या युद्धाची मुहूर्तमेढ रोवली असे आपण म्हणूया. आधुनिक जगात युद्ध हे समोरासमोर येऊन युद्ध करण्यासारखे राहिले नाही. या युद्धात आता तांत्रिकी क्षेत्रातील नवीन संशोधनांमुळे मानवी हत्या खूपच कमी झाल्या आहेत. त्याचे कारण संगणक युगात बनले जाणारे नकाशे. या नकाशामुळे युद्ध करण्यात बरीच प्रगती मानवाने केली आहे. ती प्रगती कशी ते आपण पाहू.
भारतात पहिल्यापासून म्हणजे इंग्रजांपासून जमिनीचे नकाशे बनवण्यास सुरुवात केली होती व त्यावरून कोणती जमीन कुणाची याची नोंद ग्रामपंचायतीत होत असे. कालांतराने याचे रूपांतर सध्याच्या सातबाराच्या उतार्यात झाले व आजवर चालू आहे. आता आपण पाहू हे नकाशे कसे बनतात व ते संरक्षणाशी कसे निगडीत आहेत. भारतात नकाशे बनवण्याचे काम सर्व्हे ऑफ इंडिया करते. ही खूप मोठी प्रक्रिया असते. पूवीर्र् स्पेशल अधिकारी जागेवर जाऊन नकाशे बनवत असत व भांडणे मिटवत असत.
पूर्वीच्या काळी या नकाशांचे महत्त्व फक्त सातबारा मिळवण्यापुरतेच होते; पण जसे युद्धे सुरू झाली व युद्धात बरीच मानवांची हत्या व्हायला लागल्या व बरेच नुकसान झाले तेव्हा युद्धशास्त्रात बदल व्हावयाला लागले व आधुनिकीकरण व संगणकाचा वापर सुरू झाला. युद्धात थलसेना अधिकार्याला नकाशे वाचता यायलाच पाहिजे तरच तो अधिकारी आपल्या सैन्याचे प्राण वाचवू शकतो, इतके महत्त्व या आधुनिक नकाशांना आले आहे. याचे उत्तम उदाहारण म्हणजे अमेरिका-इराक युद्ध. इराकमधील बंकर उडवणारे अमेरिकेची मिसाइल फेल होत होती.
तेव्हा अमेरिकेने आपल्या इस्रोकडून आधुनिक नकाशे खरेदी केले. जे खूपच अचूक होते व त्यावरून मिसाइल डागली व इराकचा पराभव केला. म्हणून नवीन युद्धशास्त्रात नकाशांना खूपच महत्त्व प्राप्त झाले आहे. नुसते आधुनिक नकाशे असून चालत नाहीत तर ते सतत मॉडीफाय करावे लागतात. जसे की अमेरिकेकडे नकाशे होते; पण ते जुने झालेले होते म्हणून मिसाइल अटॅक फोल ठरत होता. तसेच हे नकाशे वापरणार्याला ते वापरायचे कसे याचे ज्ञान असणे महत्त्वाचे आहे. म्हणून भारताच्या संरक्षण विभागाने याचे महत्त्व अगोदरच ओळखून अधिकार्यांना नकाशाच्या बाबतीत अवगत केले होते.
जो नकाशा आपण आपल्या मोबाइलमध्ये बघतो तो खूपच सामान्य असतो. त्याच्यात थोड्याफार सुविधा असतात. काही नकाशे नगरपालिका व ग्रामपंचायतीत वापरले जातात. ते तेवढ्यापुरते ठीक आहे. पण युद्धाच्या वेळेस ते नकाशे चालत नाहीत. म्हणून दोन प्रकारचे नकाशे वापरले जातात- जनरल सीरिज मॅप्स आणि डिफेन्स सीरिज मॅप्स डीएसएम. हे नकाशे कोणालाही मिळत नाहीत. ते फक्त मिलिटरी वापराकरता असतात. हे नकाशे बनवण्याचे काम थलसेना करत असते तसेच ते नकाशे अपडेट करण्याचे कामही थलसेना करत असते. हे नकाशे थलसेना व वायुसेना वापर करत असते, तर नेव्हीचे नकाशे दुसर्या एजन्सीज करतात.
या नकाशांना एवढे महत्त्व का, तर हे नकाशे म्हटल्याप्रमाणे संपूर्ण जगाचे बनतात व त्यांचे कोऑर्डिनेट्स असतात व या कोऑर्डिनेट्समुळे वायुसेना अचूक मिसाइलचा मारा करू शकते व सामान्य जनतेला बाधा पोहोचेल असे अटॅक करत नाही. काही वेळा हे कोऑर्डिनेट्स मिसाइलमध्ये टाकून मिसाइल फायर केले जाते व अचूक निशाणा साधला जातो. त्यामुळे ज्याच्याकडे लेटेस्ट नकाशे आहेत तो युद्धात बाजी मारणार हे नक्की.
हे नकाशे वापरण्याचे तंत्र पुण्यातल्या बर्याच संरक्षण विभागात दिले जाते. संरक्षण अथिकारी या तंत्राचा वापर त्याच्या संरक्षणनीतीमध्ये वापर करून संरक्षण क्षेत्रात आधुनिकी व प्रौद्योगिकीचा वापर करून आपल्या भारतवासीयांचे सदैव संरक्षण करतील याचा सार्थ अभिमान प्रत्येक भारतीयाच्या मनात आहे.
भारतात 324 विभाग
आपल्या भारत देशाचा विचार केला तर संपूर्ण भारत 324 विभागात विभागला आहे. प्रत्येक भागाला एक नाव दिले आहे हे नाव युनिक आहे व ते जगातल्या कोणत्याही भागाला दिलेले नाही. आपल्याकडे थलसेनामध्ये खूपच मोठमोठे नकाशे बनवले आहेत व अजूनही वापरात आहे. ते नकाशे पाहिले की असे लक्षात येते की, पूर्वी या अधिकार्यांनी किती मेहनत घेऊन हे नकाशे तयार केले आहेत. आताच्या संगणक युगात हे काम फारच सोपे झाले आहे.
विमानही बनवतात नकाशे
कधी कधी आपण सकाळी झोपून उठल्यावर आकाशात पाहिले की एक विमान धूर सोडत जाताना दिसायचे. लहानपणी काही कळायचं नाही. आईवडील सांगायचे की, असे विमान जात आहे; पण जेव्हा नकाशांचा अभ्यास करायला सुरुवात केल्यावर कळले की ते विमान नकाशे बनवण्याचे काम करत आहेत. आता संपूर्ण जगाचे नकाशे काही तासात आपले उपग्रह मिळवू शकतात. उपग्रहाने फोटो काढून व जमीन मॅप करून ते जमिनीवरच्या लॅबकडे पाठवले जातात, त्यावर प्रक्रिया करून सेनेला वापरण्याजोगे नकाशे तयार केले जातात व पाहिजे तेव्हा ते वापरात आणले जातात.





