Ozar News : संकष्टी चतुर्थी दिनी लाखो भाविकांनी घेतले श्री विघ्नहराचे दर्शन

ओझर : संकष्टी चतुर्थी निम्मित लाखो भाविकांनी श्री विघ्नहराचे दर्शनचा लाभ घेतला. श्री क्षेत्र ओझर येथे पहाटे 5 वाजता श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब कवडे,विश्वस्त विनायक मांडे,शिल्पाताई जगदाळे यांच्या शुभाहस्ते श्रींना महाअभिषेक पूजा करून दर्शानासाठी मंदिर खुले करण्यात आले. मंदिरामध्ये चतुर्थी निमित्त महाआरती करण्यात आली.
महाआरतीचा मान समीर टेमगिरे,गौरव टोपे,प्रतिक कवडे,चंद्रकांत काचळे,मयुरेश दिघे यांना मिळाला. आज विशेष म्हणजे तिथी प्रमाणे शिवजयंती असल्याने या माहाआरतीमध्ये शिवरायांची देखील आरती करण्यात आली. या आरती मध्ये अध्यक्ष बाळकृष्ण कवडे ,उपाध्यक्ष तुषार कवडे,सचिव सुनील घेगडे,खजिनदार दत्तात्रय कवडे,विश्वस्त,सुर्यकांत रवळे,विक्रम कवडे, विनायक मांडे, संतोष कवडे, विलास कवडे, विनायक जाधव, शिल्पा जगदाळे यांची उपस्थिती होती.
पहाटे ५ ते रात्री ११ पर्यंत रांगेत सुमारे एक लाख भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. सकाळी ७.३० वा. व दुपारी १२.०० वा. मध्यान्ह आरती करण्यात आली. सकाळी ८.०० वा. नियमित पोथी वाचन करण्यात आले.सकाळी १०.३० वा.’’श्री” स नैवद्य दाखवून भाविकांना खिचडी वाटप श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट च्या वतीने करण्यात आली. आज संकष्टी चतुर्थी निमित्ताने विघ्नहर मंदिरात फुलांची आरस विघ्नहराला रेशमी जरीचा पोशाख करण्यात आला होता. तसेच सोन्याचे अलंकार श्री विघ्नहराला परिधान करण्यात आले. व येणाऱ्या भाविकांसाठी मंदिरात दर्शनरांग,पिण्याचे पाणी,अभिषेक व्यवस्था. देणगी कक्ष ,अभिषेक करण्यासाठी शमी वृक्षाखाली व्यवस्था,दर्शन झाल्यानंतर विसाव्यासाठी विघ्नहर उद्यान ,चप्पल स्टॅन्ड पार्किंग, कमीत कमी वेळेतील दर्शनासाठी मुखदर्शन व्यवस्था इत्यादी व्यवस्था करण्यात आली.
सायंकाळी ७.०० वा. नियमित हरिपाठ करण्यात आले. व चंद्रोदयापर्यंत कीर्तनकार ह.भ.प.योगिता बढे,धालेवाडी,यांचे हरिकीर्तन झाले.त्यांना साथसंगत राम प्रसादिक भजनी मंडळ शिरोली यांनी दिली. आजचे अन्नदाते संतोष शांताराम कवडे,ओझर यांनी चतुर्थीचे वारकरी अन्नदान केले रात्रौ १०.३० वाजता शेजआरती करून ११.०० वाजता मंदिर बंद करण्यात आले. आजच्या महाआरतीच्या मानकरी यांनी विकास कामात सहभागी होवून ट्रस्ट ला देणगी दिली.
दानशूर व्यक्तीमत्व समीर टेमगिरे,शिवाजीराव एलमामे,प्रतिभा कुलथे यांनी देवस्थान ट्रस्ट ला देणगी दिली.आलेल्या भाविकांचे स्वागत देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष बाळकृष्ण कवडे ,उपाध्यक्ष तुषार कवडे,सचिव सुनील घेगडे,खजिनदार दत्तात्रय कवडे,विश्वस्त, प्रकाश मांडे , सुर्यकांत रवळे, गोविंद कवडे ,विक्रम कवडे, समिर मांडे , विनायक मांडे , संतोष कवडे, विलास कवडे , विनायक जाधव, मंगेश पोखरकर,सौ.शिल्पा जगदाळे, यांनी केले. गर्दीचे नियोजन देवस्थान ट्रस्ट चे व्यवस्थापक व कर्मचारी यांनी केले.





