‘डॉन 3’ चित्रपटात कियाराची जागा घेणार ‘लेडी डॉन’; अभिनेत्रीची रिअॅक्शन व्हायरल

Don 3 Movie | दिग्दर्शक फरहान अख्तरच्या ‘डॉन 3’ चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. यात अभिनेता रणवीर सिंह मुख्यभूमिकेत पाहायला मिळणार आहे. तर त्याच्यासोबत अभिनेत्री कियारा अडवाणी दिसणार होती. मात्र आता ती या चित्रपटातून बाहेर पडली आहे. गरोदर असल्यामुळे कियाराला या सिनेमातून काढता पाय घ्यावा लागला. त्यामुळे आता तिच्या जागी कोणत्या अभिनेत्रीची वर्णी लागणार? असा सवाल उपस्थित केला जात होता.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आता कियाराऐवजी क्रिती चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. क्रितीच्या रिअॅक्शनचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तिच्या प्रतिक्रियेवरून ती चित्रपटाचा भाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. क्रिती एका कॅफेमधून बाहेर पडत असताना तेव्हा पापाराझींनी तिला पोज द्यायला सांगितले.
तेव्हा ते म्हणाले की, ‘क्रिती जी, डॉन ३, लेडी डॉन, थांबा लेडी डॉन इथे आहे.’ हे ऐकताच क्रिती लाजली. त्यानंतर काहीही न बोलता, ती हसत कारमध्ये बसली. तिच्या या प्रतिक्रियेमुळे चाहत्यांना खात्री पटली आहे की ती फरहान अख्तरच्या चित्रपटात दिसणार आहे.
View this post on Instagram
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, फरहान अख्तर आणि एक्सेल एंटरटेनमेंटची क्रिएटिव्ह टीम डॉन 3 मध्ये स्क्रीन प्रेझेन्स असलेली अनुभवी अभिनेत्री घेण्याचा विचार करत होते आणि क्रिती या भूमिकेसाठी परिपूर्ण आहे. तिच्याकडे रोमाची भूमिका साकारण्यासाठी ऑन-स्क्रीन परिपूर्णता आहे आणि ती लवकरच चित्रपटात साइन करु शकते. Don 3 Movie |
दरम्यान, मे महिन्यात क्रिती सनॉनला फरहान अख्तरच्या मुंबईतील एक्सेल एंटरटेनमेंटच्या ऑफिसबाहेर दिसली. त्यावेळी अनेकांनी ‘डॉन 3’ मध्ये मुख्य भूमिकेसाठी क्रितीला निवडले जाऊ शकते, असा अंदाज लावला होता. मात्र या सर्वाची अद्याप पुष्टी झालेली नाही. Don 3 Movie |
क्रिती सनॉनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती शेवटची ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या ‘दो पत्ती’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिची दुहेरी भूमिका होती. यात काजोलही महत्त्वाची भूमिका साकारताना दिसली. Don 3 Movie |
हेही वाचा :
Pune Bridge Collapse : अजित पवार मावळ दुर्घटनेची जबाबदारी घेणार का? संजय राऊतांचा संतप्त सवाल





